शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 16:59 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असताना धक्कादायक निर्णय, कारण काय? 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगाबाद-मध्य विधानसभा मतदार संघाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने उद्धव सेनेला खूप मोठा फटका बसला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असताना तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. यामागे कोणते कारण असावे, ठाकरे सेने आता ऐनवेळी दूसरा कोणता उमेदवार मैदानात उतरवणार याबाबत राजकीय गोटात चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुतांश ठिकाणी शिंदे सेना आणि ठाकरे सेना अशी लढत होणार आहे. शहरातील मध्य मतदार संघामध्ये शिंदेसेनेकडून आमदार प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. तर ठाकरे सेनेकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, तनवाणी यांनी कालच उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची रॅली बाजारपेठेत गर्दी होऊन नागरिकांना त्रास होईल असे कारण देत रद्द केली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले. 

प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी हे दोघेही कट्टर शिवसैनिक आणि बालमित्र आहेत. यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागले होते. दोघेही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. यावेळी मत विभागणी होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. यावेळी देखील प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी आणि एमआयएमचे नासेर सिद्दिकी मैदानात आहेत. २०१४ सारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. सन २०१९ मध्ये जैस्वाल यांनी २०२४ च्या निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. मात्र, आता मी दोन वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो. परंतु ते पाठिंबा देण्यास तयार नाहीत. यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा उद्धव सेनेचे उमेदवार तनवाणी यांनी केली. 

गटबाजीमुळे माघार? तनवाणी यांच्या या निर्णया मागे पक्षांतर्गत गटबाजी असल्याची बोलले जात आहे .याविषयी मात्र तनवाणी यांनी भाष्य केले नाही. तर पक्षाकडून देण्यात येणाऱ्या दुसऱ्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभे राहू असेही तनवाणी यांनी जाहीर केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकKishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीShiv Senaशिवसेना