शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘महारेरा’ची मोठी कारवाई! छत्रपती संभाजीनगरातील आठ बांधकाम प्रकल्पांची नोंदणी स्थगित

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 22, 2023 12:48 IST

मराठवाड्यातील एकूण दहा गृहप्रकल्पांवर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर : आपल्या बांधकाम प्रकल्पाची माहिती ‘महारेरा’च्या साइटवर अपडेट केली नाही. यामुळे राज्यातील राज्यात २४८ प्रकल्पांची नोंदणी स्थगित करण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगरातील आठ बांधकाम प्रकल्पांचा समावेश आहे. ‘महारेरा’ने केलेली ही कारवाई मोठी मानली जात आहे.

का करण्यात आली कारवाई?एखाद्या बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी ‘महारेरा’त केल्यानंतर, त्याची अद्ययावत माहिती ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर दर तीन महिन्यांनी देण्याची जबाबदारी त्या बांधकाम व्यावसायिकावर असते. ‘जानेवारी, फेब्रुवारी, मार्च’, ‘एप्रिल, मे, जून’, ‘जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर’ आणि ‘ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर’ अशा तीन-तीन महिन्यांची अद्ययावत माहिती द्यावी लागते. मात्र, अशी माहिती संकेतस्थळावर सादर करत नसल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली.

मराठवाड्यातील त्या दहा गृहप्रकल्पांवर प्रश्नचिन्हमहारेराने माहिती अद्ययावत न करणाऱ्या २८४ गृहप्रकल्पांवर कारवाई केली. त्यात मराठवाड्यातील दहा प्रकल्पांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरातील ८ व जालना १ व बीड १ गृहप्रकल्प आहे. या प्रकल्पांचे काय होणार, त्या गृहप्रकल्पात जर ग्राहकांनी बुकिंग केली असेल तर त्यांचे काय होणार, त्या बांधकाम प्रकल्पाला पुढे काही अटींवर परवानगी देण्यात येईल का? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.

...तर स्थगिती उठू शकतेअल्पकालीन स्थगिती ही ‘महारेरा’च्या प्रक्रियेचा भाग आहे. प्रकल्पाच्या कार्यादरम्यान वेळोवेळी देण्यात येणाऱ्या माहितीमध्ये तफावत आढळल्यास कारणे दाखवा नोटीस दिली जाते. कारणे दाखवा नोटीसनंतर गृहप्रकल्पास तात्पुरती स्थगिती दिली जाते, हा एक प्रक्रियेचा भाग असून संबंधित बांधकाम व्यावसायिक त्या कागदपत्रांची पूर्तता करून स्थगिती उठवू शकतात.- रोहित सूर्यवंशी, सचिव, क्रेडाई

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017