बिडकीन ग्रा.पं.मध्ये सदस्यांचा धिंगाणा
By Admin | Updated: August 14, 2014 01:52 IST2014-08-14T01:36:28+5:302014-08-14T01:52:06+5:30
बिडकीन ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. मासिक सभेच्यावेळी येथे धिंगाणा करण्यात आला, तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्यामुळे त्यांनी सामूहिक रजेवर जाणे पसंत केले.

बिडकीन ग्रा.पं.मध्ये सदस्यांचा धिंगाणा
बिडकीन : येथील ग्रामपंचायतला डीएमआयसीमुळे मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे; परंतु बिडकीन ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. मासिक सभेच्यावेळी येथे धिंगाणा करण्यात आला, तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्यामुळे त्यांनी सामूहिक रजेवर जाणे पसंत केले. बुधवारी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिडकीन ग्रामपंचायत ही तालुक्यात सर्वात मोठी, तर जिल्ह्यात जास्त उत्पन्न असणारी ग्रामपंचायत आहे. त्यातील उत्पन्नाचे स्रोत म्हणजे ग्रामपंचायत मंगल कार्यालय, ३५ व्यापारी गाळे, आठवडी बाजार कर, जनावरांचा बाजार, घरपट्टी, नळपट्टी परंतु सध्या ग्रामपंचायत सदस्य व महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाईकांत वाद सुरू आहे. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकी देण्याचा प्रकार मासिक सभेत घडल्यामुळे कर्मचारी सामूहिक रजेवर गेले. त्यामुळे बुधवारी बिडकीनकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर एकाच प्रभागाला मिळाले तर काही वाया गेले.
सरपंच गभाबाई चव्हाण, अशोक धर्मे, वामन साठे, माणिक राठोड यांनी महिला सदस्याचा मुलगा चंद्रकांत चाबुकस्वार यांच्याविरुद्ध ठाण्यात तक्रार केली आहे. (वार्ताहर)