लातूरमार्गे धावणार बीदर-मुंबई रेल्वे
By Admin | Updated: July 9, 2014 00:32 IST2014-07-08T23:12:00+5:302014-07-09T00:32:18+5:30
लातूर/उदगीर : गेल्या अनेक वर्षांपासून उदगीर ते मुंंबई रेल्वेची मागणी उदगीरकरांनी केली होती़ रेल्वे अर्थसंकल्पात बीदर-उदगीर-मुंबई रेल्वेची घोषणा करण्यात आली आहे़

लातूरमार्गे धावणार बीदर-मुंबई रेल्वे
लातूर/उदगीर : गेल्या अनेक वर्षांपासून उदगीर ते मुंंबई रेल्वेची मागणी उदगीरकरांनी केली होती़ रेल्वे अर्थसंकल्पात बीदर-उदगीर-मुंबई रेल्वेची घोषणा करण्यात आली आहे़ सदरील रेल्वे लातूरहून जाणार असल्याने आता लातूरकरांचीही सोय होणार आहे़ खासदार सुनील गायकवाड यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे ही मागणी लावून धरल्याने नवी रेल्वेची घोषणा झाली आहे़ त्यामुळे उदगीर शहरात भाजपा कार्यकर्ते व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला़ रेल्वेची घोषणा झाल्यावर पेढे वाटण्यात आले़ रेल्वेची मागणी मंजूर करण्यात आल्याने उदगीरकरांच्या वतीने खा़ सुनील गायकवाड यांचा सत्कार करण्यात येणार आहे़ यापुढे अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा भाजपाचे युवा नेते राहुल केंद्रे यांनी व्यक्त केली़ यावेळी भाजपाचे श्रीराम कुलकर्णी, धर्मपाल नादरगे, नीळकंठराव पाटील, हणमंत हंडरगुळे, संगम आष्टुरे, साईनाथ चिमेगावे, अविनाश रायचूरकर, संजय पाटील, बाबासाहेब पाटील, वसंतराव जाधव, बसवराज रोडगे, सुधाकर बिरादार, लक्ष्मण बदले, जयराम पाटील, उदयसिंह ठाकूर, अब्दुलहक पटेल, दत्ता बुर्ले, गणेश गायकवाड, मोईज शेख, सादीक शेख, शेरखॉ पठाण, वसंत गोटमुकले, निलेश पेठे, सुजीत जीवने आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)$$्निरेल्वेचे बजेट अत्यंत चांगले आहे: खा़ सुनिल गायकवाड
रेल्वेचे बजेट अतिशय चांगले सादर केले आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो़ ज्यांनी बिदर ते मुंबई गाडी घोषणा केली़ माझ्या मतदार संघातील मागणी मंजूर झाली आहे़ अत्याधुनिकीकरणाद्वारे रेल्वे बजेट आहे़ आता बुलेट ट्रेन चालू करणार आहोत़ मराठवाड्यातील इतर प्रश्न सोडवण्याचा रेल्वेमंत्री प्रयत्न करतील अशी अपेक्षा लातूरचे खासदार डॉ़सुनिल गायकवाड यांनी व्यक्त केली़
या रेल्वे बजेटने आश्वासनांची खैरात केली आहे़ केवळ स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न केला आहे़ महाराष्ट्राची निराशा केली आहे़ मराठवाड्याची तर घोर निराशाच आहे़ प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष आहे़ अहमदाबाद ते मुंबई रेल्वे गुजरातमध्ये नेली आहे़ नको तेथे खर्च केला आहे़ ६० हजार कोटींची तरतूद खाजगीकरणासाठी आहे़ उद्योगपतींचे भले करणारे हे बजेट आहे़
- आ़दिलीपराव देशमुख
रेल्वे बजेट ने महाराष्टा्रची निराशा केली आहे़ बजेटमध्ये काही नवीन केले नाही़मराठवाड्यावर तर घोर अन्यायच़ मराठवाड्यातील नगर,बीड रेल्वेसाठी १९९५ पासून पाठपूरावा करुनही या बजेटमध्ये त्याचा विचार झाला नाही़ रेल्वे बजेट सादर होण्याआधीच भाडेवाढ केली आहे़ बीजेपी शासन हे खाजगीकरणाकडे झूकत आहे़ हे सामान्य माणसाला परवडणारे नाही़ रेल्वे बजेटने घोर निराशा केली आहे़
- माजी खा़ डॉ़ जे़एम़वाघमारे
हा रेल्वे अर्थसंकल्प आयडियल आहे़ या बजेट प्रमाणेच सगळेच प्रकल्प होतील़ नवीन सरकार कमेंटमेंट देत आहेत़ नव्या गोष्टी करायला तयार आहेत़ विचारात मॉर्डनायजेशन करून घेत आहेत़ एक प्रकारचा आरसा आहे़ सरकारने विकासाचा निर्धार केला आहे़ हा निर्धार एका वर्षात पूर्ण करता येणार नाही़ या रेल्वे अर्थसंकल्पाचं कौतुक व्हायला पाहिजे़
-माजी खा़डॉग़ोपाळराव पाटील