दुचाकी चोरट्यांचा शहरात धुमाकूळ
By Admin | Updated: September 17, 2014 00:26 IST2014-09-17T00:25:43+5:302014-09-17T00:26:40+5:30
नांदेड : शहरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़

दुचाकी चोरट्यांचा शहरात धुमाकूळ
नांदेड : शहरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने यातील काही चोरटे पोलिसांच्या हातीही लागले आहेत़
शहरातील मुख्य बाजारपेठ, डॉक्टरलेन, बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच विविध भागात घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी पळविण्याच्या घटनांत वाढ झाली आहे़ त्यात वजिराबाद येथील शंकरराव संधू यांची एम़एच़२६ डी़९९२७ या क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली़ याप्रकरणी वजिराबाद ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ (प्रतिनिधी)