भरधाव कारची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 10:17 PM2019-06-02T22:17:25+5:302019-06-02T22:17:34+5:30

औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब चौकात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली.

Bicycle car bikes | भरधाव कारची दुचाकीला धडक

भरधाव कारची दुचाकीला धडक

googlenewsNext



वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब चौकात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. यानंतर कारचालक महिला पळून जाण्याच्या तयारी असताना वाहतूक पोलिसांनी अडविले. त्यामुळे जवळपास अर्धा तपास वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची पोलिसांत नोंद घेण्यात आली आहे.
वाळूजकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव कारने (एमएच-२०, ईवाय-८४४८) एएस क्लब चौकात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास स्कुटीला पाठीमागून धडक दिली. या अपघातामुळे भांबावलेली महिला चालक पळून जाण्याच्या तयारीत होती. वाहतूक पोलिसांनी कार अडविण्याचा प्रयत्न केला. जवळपास अर्धा ते पाऊणतास हा गोंधळ सुरु असल्याने चौकात वाहतूक कोंडी होवून रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची पोलिसांत नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: Bicycle car bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.