हतनूर ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:37+5:302021-02-05T04:08:37+5:30
गेल्या कित्येक वर्षांपासून हतनूर गावाला ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत नाही. यासंदर्भात मागणी केली जात होती. उद्यसिंग राजपूत यांच्या आमदार निधीतून ...

हतनूर ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन
गेल्या कित्येक वर्षांपासून हतनूर गावाला ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत नाही. यासंदर्भात मागणी केली जात होती. उद्यसिंग राजपूत यांच्या आमदार निधीतून १८ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष कैलास अकोलकर यांनी नव्याने निवडून आलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातल्या विकासासाठी कटिबद्ध राहतील, येणाऱ्या काळात गाव प्रगतीपथावर नेण्याचे काम एकोप्याने करू असे आश्वासित केले. तर आ. राजपूत यांनी सांगितले की, गावासाठी अधिकाधिक निधी मिळवून देऊ. तसेच हतनूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरणाचे कामदेखील लवकरच सुरू होईल, असे सांगितले. या सोहळ्याप्रसंगी सेना तालुकाप्रमुख केतन काजे, पं. स. सदस्य किशोर पवार, कैलास अकोलकर, एस. बी. अकोलकर, प्रशासक एस. डी. चव्हाण, जि. प. उपअभियंता एस. एस. चव्हाण, शाखा अभियंता वाय. आर. आधोडे, प्रवीण नलावडे, माजी सरपंच कारभारी गवळी, कैलास मोहिते आदींची उपस्थिती होती.
-------------
फोटो :