शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

भोकरला पाच दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 23:27 IST

विठ्ठल फुलारी, भोकर तालुक्यासह भोकर शहरातही तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या सुधा प्रकल्पात १५ टक्के तर धानोरा तलावात १ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़

विठ्ठल फुलारी, भोकर तालुक्यासह भोकर शहरातही तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या सुधा प्रकल्पात १५ टक्के तर धानोरा तलावात १ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ यामुळे शहरात आता पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असून शहरातील जुने सर्वच बोअर सुरु करण्यात येणार आहेत़तालुक्यात भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे़ अनेक गावांतील अधिग्रहण केलेले बोअरही आता बंद पडत आहेत़ जनावरांचा पाणीप्रश्नही गंभीर झाला असून सहा तलाव कोरडे पडले आहेत़ ग्रामीण भागासह आता शहरातही पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे़ शहरासाठी पाणीपुरवठा होणाऱ्या सुधा प्रकल्पात १५ टक्के पाणीसाठा असून धानोरा तलावात केवळ १ टक्के साठा उपलब्ध आहे़धानोरा तलाव लवकरच तळ गाठणार असल्याने भोकर शहराची सर्व भिस्त सुधा प्रकल्पावर राहणार आहे़ आजघडीला शहरात पाच दिवसआड पाणीपुरवठा होत असल्याने हे पाणी नागरिकांना अपुरे पडत आहे़ अनेक गरीब कुटुंबांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठवण करण्यासाठी सुविधा नसल्याने पाच दिवसाआड येणारे पाणी दोन दिवसांत संपत असून नागरिकांना पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़या पाणीपुरवठा योजनेला शहरातील ६० बोअरला आधार देवून नगर परिषद पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे़ शहरात ग्रामपंचायत काळातील व त्यानंतर घेतलेले २०० बोअर आहेत़ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने हे बोअर बंद करण्यात आले होते़ पण सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता पुन्हा हे सर्वच बोअर चालू करण्यात येणार आहेत़; पण पाणीपातळी घटत चालल्याने यातील किती बोअर चालतील हे पहावे लागणार आहे़ पाणीपुरवठा योजनेवर होणारा खर्च व आता नव्याने बोअरवर आगाऊ खर्च नगर परिषदेला सहन करावा लागणार आहे़ विशेष म्हणजे, शहरातील बहुतांश बोअरच्या पाण्यात फ्लोरासीसचे प्रमाण जास्त असल्याने हे पाणी पिण्यास कितपत योग्य आहे? असाही प्रश्न उपस्थित होत असून शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे़