भोई समाजाची निदर्शने
By Admin | Updated: August 23, 2014 00:48 IST2014-08-23T00:07:24+5:302014-08-23T00:48:13+5:30
भोई समाजाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी भोई समाज क्रांती दल आणि अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली़

भोई समाजाची निदर्शने
भोई समाजाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी भोई समाज क्रांती दल आणि अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली़ भोई समाजास १९५० पुर्वी मिळत असलेल्या अनुसूचित जमातीच्या सवलती पुन्हा मिळाव्यात या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले़ आंदोलनामध्ये नानासाहेब लकारे, दत्ता तोकलवाड, राजू मामुलवार, जगदिश कोटगीर, लिंगोजी आडगुलवार, सुभाष हिवरे, श्रीराम डुबुकवाड, गणपतराव पांडलवार, शंकर खंडागळे, सुभाष कुकडे, रामदास तोकलवाड, सचिन जमदाडे, धोंडीबा पंदीलवाड, मारोती डुबूकवाड आदींची उपस्थिती होती़
गोर सेनेचा रास्ता रोको
नांदेड : गोर बंजारा समाजाला अनुसुचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गोर सेनेच्या वतीने शुक्रवारी आसना पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ त्यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती़
देशभर विखुरलेल्या गोर (बंजारा,लमाणी,लम्बाडा) ची भाषा, पेहराव, रिती, राहणीमान सारखे असताना विविध राज्यात वास्तव्यास असलेल्या गोरचे आपसात नातेसंबध आहेत़ अनुसुचित जमाती प्रवर्गाचे निकष लागू पडतात तेव्हा गोर समाजाला अनुसुचित जमातीत समाविष्ट करावे़ तसेच गोर बोलीला भाषेचा दर्जा द्यावा, सुशिक्षित गोर नागरीकांना बेरोजगार भत्ता द्यावा, तालुक्याच्या ठिकाणी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, स्पर्धा परिक्षा, रोजगार मार्गदर्शन केंद्राची व्यवस्था करावी, शाळा, महाविद्यालयात प्रवेशावेळी शुल्क माफी द्यावी़
या मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने आसना पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतुक खोळंबली होती़ आंदोलनात जिल्हाध्यक्ष अॅड़प्रदीप राठोड, पप्पू चव्हाण, नयन राठोड, संदीप राठोड, सदाशिव राठोड, गोपीनाथ पवार, मयूर चव्हाण, शाम चव्हाण, गोपाळ राठोड, प्रमोद राठोड, स्वप्नील राठोड, रोहित राठोड यांचा सहभाग होता़ (प्रतिनिधी)