भोई समाजाचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: August 23, 2014 00:45 IST2014-08-22T23:58:14+5:302014-08-23T00:45:12+5:30

परभणी : भोई समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी समाजाच्या वतीने २२ आॅगस्ट रोजी परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले.

Bhoi community's movement of dharna | भोई समाजाचे धरणे आंदोलन

भोई समाजाचे धरणे आंदोलन

परभणी : भोई समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी समाजाच्या वतीने २२ आॅगस्ट रोजी परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. हा समाज भटक्या जमातीत समाविष्ट आहे. या समाजाला केवळ २.५ टक्के आरक्षण आहे. त्यात इतर जातींचाही समावेश आहे. या समाजाला १९३६ ते १९५० या कालावधीत अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत होत्या. त्या पुन्हा मिळाव्यात. तसेच इतर राज्यात भोई समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे. शासनानेही भोई समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात, अशी शिफारस केली आहे.
या शिफारसीनुसार सवलती मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष गोविंद जमदाडे, बापूराव तावडे, केशव आडणे, दुर्गादास मेसरे, भगवान घटमाळ, मारोती लांडगे, हनुमान नागुल्ला, विश्वनाथ गव्हाणे, दत्ता जमदाडे, निलाधर जमदाडे आदींसह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Bhoi community's movement of dharna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.