शहरं
Join us  
Trending Stories
1
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
2
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
3
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
4
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
5
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
6
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
7
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
8
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
9
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
10
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
11
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
12
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
13
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
14
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
15
IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
16
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
17
‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
18
अमेरिका इराणमध्ये मोठी कारवाई करणार? इस्रायलकडे इनपुट? देश सतर्क
19
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध लेणीवर उसळला भीमसागर; २५ एकरांत साकारणार विशुद्धानंद बोधी फाउंडेशनचा भव्य प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:31 IST

अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर बाबासाहेबांनी या देशाचे संविधान लिहिले : प्रकाश आंबेडकर

छत्रपती संभाजीनगर : ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध लेणीवर सकाळपासूनच भीमसागर उसळला होता. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये शेकडो नव्हे, हजारो नव्हे, लाखोंच्या संख्येने येऊन उपासक- उपासिकांंनी तथागतांचे व बुद्ध धम्माची दीक्षा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनोभावे स्मरण केले. जयजयकारही केला. दरवर्षीप्रमाणेच बुद्ध लेणी परिसर नटला होता. शेकडो पुस्तकांची दुकाने थाटली गेली होती. अनेक ब्लड बँका रक्तदान करून घेण्यासाठी सज्ज झालेल्या होत्या, तर अनेक आंबेडकरी संघटना अन्नदानासाठी व पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या.

जमीन सरकारने स्वत:हून द्यावी : ॲड. आंबेडकरबुद्ध लेणीच्या पायथ्याजवळील २५ एकरांत साकारण्यात येणारा विशुद्धानंद बोधी फाउंडेशनचा प्रकल्प सायंकाळी ॲड. बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लाँच करण्यात आला. या प्रकल्पासाठी पुढील वर्षांपर्यंत जमीन उपलब्ध झाली पाहिजे, असा आग्रह यावेळी ॲड. आंबेडकर यांनी धरला. या प्रकल्पांतर्गत तथागत गौतम बुद्ध व सम्राट अशोकांचे शंभर फुटी पुतळे उभारण्यात येणार आहेत. विशुद्धानंद बोधी महाविहाराची उभारणी करण्यात येणार आहे. आठ एकरांत बाग-बगीचा विकसित करून हे स्थळ पर्यटनस्थळ ठरावे, असे नियोजन आहे. ‘बुद्ध लेणी बचाव’ मोर्चा निघाल्यानंतर जागेसंबंधीचा प्रस्ताव सरकारकडेच पडून असल्याची खंत यावेळी भदंत विशुद्धानंद बोधी यांनी व्यक्त केली. ही जमीन सरकारने स्वत:हून द्यावी. प्रकल्प उभारावा असे वाटत असेल तर इथे एकवटलेली शक्ती मतपेटीतून दिसली पाहिजे, असे आवाहन बाळासाहेबांनी केले.

चारित्र्यवान बना......ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी सविस्तर भाषण केले. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचं संविधान लिहिलं असं त्यांनी नमूद केलं. त्यांनी सांगितले की, बुद्धीचा वापर करायला शिकलं पाहिजे. त्यासाठी ज्ञान पाहिजे. हिंमत पाहिजे. ज्ञान आणि हिंमत सत्ता देते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सत्तेमुळे समाजात काय पेरायचं हे ठरवता येते. शिवाय मतदान करताना विकले जाऊ नका असेही त्यांनी नमूद केले. प्रांतोष वाघमारे, दीपक निकाळजे व बाबा तायडे यांनी या सभेचे सूत्रसंचालन केले. भाषणापूर्वी बाळासाहेबांना समता सैनिक दलाने सलामी दिली.

‘मी रमाई बोलतेय’ ने मने जिंकलीबाळासाहेब आंबेडकर येण्यापूर्वी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ‘ घटनेच्या चौकटीत पोलिस दल चांगले काम करेल’ असे आश्वस्त केले. तत्पूर्वी प्रेरणा खरात या अभिनेत्रीने ‘ मी रमाई बोलतेय’ हे स्वगत सादर केले. ते ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. ज्योत्सना कांबळे यांनी प्रेरणाचे धम्मदान देऊन स्वागत केले. यानंतर उपस्थितांनी उभे राहून २२ प्रतिज्ञा ग्रहण केल्या.

भीमयुगाची पहाट....भीमयुगाची पहाट या संचाचे मुख्य गायक प्रकाशदीप वानखडे, गायिका स्नेहल वानखडे व साक्षी वानखडे यांनी दुपारपासूनच लेणी परिसर बुद्ध व भीममय करून टाकला होता. तरुण गायक धम्म धन्वे यांनी ‘साऱ्या जगात कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरारा हाय’ हे गीत गाऊन धमाल उडवून दिली. साक्षी वानखडे हिने ‘लई बळ आलं, माझ्या दुबळ्या पोरात’ हे गीत सादर करुन प्रशंसा मिळविली. ॲड. बाळासाहेब आंबेडकर आल्यानंतर त्यांच्यासमोर मेघानंद जाधव यांनी ‘ मागे हटेना ही भीमसेना, बाळासाहेब आमचे सेनापती’ हे गीत खुबीने गायिले, तर प्रकाशदीप वानखडे यांनी स्वरचित ‘ बाळासाहेबांना पाहुनी भीम समाजाला दिसल्यासारखं वाटलं’ हे गीत गाऊन दाद मिळविली. 

जाण्यायेण्याच्या मार्गावर अंधारच अंधार.....विद्यापीठातून ज्या मार्गावरून बुद्ध लेणीकडे जायचे तिथे अंधारच होता. उपासक- उपासिका मोबाइलच्या टॉर्च लावून ये-जा करत होते. खरे तर विद्यापीठ प्रशासनाने प्रकाशाची सोय करायला हवी होती. एकतर लेणीकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद आहे. दोन्ही बाजूंंनी जत्थेच्या जत्थे जा- ये करीत असतात. हा रस्ता रुंद करण्याची गरज आहे. त्याचे साधे डांबरीकरणही केलेले नव्हते.

English
हिंदी सारांश
Web Title : ভীমसागर বুদ্ধ लेणी: বিশुद्धানন্দ बोधी फाउंडेशन's Grand Project Unveiled

Web Summary : Buddha Leni witnessed a massive gathering on Dhamma Chakra Day. Adv. Ambedkar launched the Vishuddhanand Bodhi Foundation project aiming to build statues and a garden. He urged government land allocation and emphasized education and unity.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर