बीड बायपास सर्व्हिस रोडचे भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:09 IST2019-01-10T00:08:45+5:302019-01-10T00:09:13+5:30
: बायपास परिसरात निसर्गरम्य वातावरणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, केवळ सर्व्हिस रोड नसल्याने रस्ता ओलांडताना काळजाचा थरकाप होताना दिसतो. जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बायपासची निर्मिती झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहतींनी परिसर गजबजून गेला, आता बायपास फक्त नावालाच राहिला असून, तो लोकवस्तीतील रस्ता ठरला आहे. याच रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सर्व्हिस रोड तयार होणे अत्यंत गरजेचे आहे.

बीड बायपास सर्व्हिस रोडचे भिजत घोंगडे
औरंगाबाद : बायपास परिसरात निसर्गरम्य वातावरणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, केवळ सर्व्हिस रोड नसल्याने रस्ता ओलांडताना काळजाचा थरकाप होताना दिसतो. जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बायपासची निर्मिती झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहतींनी परिसर गजबजून गेला, आता बायपास फक्त नावालाच राहिला असून, तो लोकवस्तीतील रस्ता ठरला आहे. याच रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सर्व्हिस रोड तयार होणे अत्यंत गरजेचे आहे. महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौकापर्यंत सर्व्हिस रोडसाठी अडथळा ठरणाऱ्या मालमत्तेवर मार्किंग करण्यात आली आहे; परंतु मालमत्तेच्या संपादनाचा मुद्दा पुढे करून सर्व्हिस रोडच्या प्रश्नावर पांघरून घातले आहे.
अपघाताने पोलीस समोर आले
बायपासवर जडवाहनांची वाहतूक व दुचाकी, चार चाकीची लगबग तसेच शाळकरी मुलांची नेआण करणाºयांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर आठवडाभराच्या अंतराने आॅगस्ट महिन्यात एकापाठोपाठ एक असे अनेक बळी गेले. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढे आली. मात्र, बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने वर हात केले आहे.
सर्व्हिस रोडवर पुन्हा टपºया
मनपाने टपºया हटवून सर्व्हिस रोड मोकळा करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु एमआयटीसमोर सर्व्हिस रोड असून, त्याच रोडवर पुढे संग्रामनगरपर्यंत मोकळाच रस्ता आहे. काही मालमत्ता सोडल्या तर नियमानुसार अनेकांनी सर्व्हिस रोडची जागा सोडूनच बांधकाम केले आहे, असे निदर्शनास येते. सर्व्हिस रोडचे काम रेंगाळल्याने पुन्हा टपºया बसविणे सुरू झाले आहे, अतिक्रमण पुन्हा वाढत असेल, तर मग त्या रस्त्याचे काम मनपा हाती का घेत नाही, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
भुयारी बोगदा आणि सर्व्हिस रोड
देवळाई चौकात रेल्वे फाटकात दर अर्ध्या तासाला थांबण्यापेक्षा काही तरी तोडगा काढून भुयारी मार्ग काढल्यास नागरिकांचा प्रवास सोयीचा होईल. अनेकदा देवळाई परिसरातील नागरिकांना संग्रामनगर पुलावरून वळसा घेऊन जालना रोड गाठावा लागतो. सर्व्हिस रोडचा प्रश्न रखडला आणि भुयारी मार्गाचा कुणी विचार करण्यास तयार नाही. शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी असल्याने रविवारशिवाय घरी राहत नाही. आंदोलन छेडण्यासाठी रस्त्यावर येता येत नाही, अशी शोकांतिका सातारा-देवळाईतील नागरिकांची झाली आहे.