भायडी पं.स.गणाची पोटनिवडणूक जाहीर

By Admin | Updated: March 29, 2016 00:36 IST2016-03-29T00:23:47+5:302016-03-29T00:36:33+5:30

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील भायडी गणाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २ एप्रिल ही शेवटची तारीख आहे़

Bhayyad Panchayat bye election announced | भायडी पं.स.गणाची पोटनिवडणूक जाहीर

भायडी पं.स.गणाची पोटनिवडणूक जाहीर


भोकरदन : भोकरदन तालुक्यातील भायडी गणाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २ एप्रिल ही शेवटची तारीख आहे़
भायडी गणाच्या कॉग्रेसच्या पंचायत समिती सदस्या मनिषा गजानन जंजाळ यांची भायडीच्या संरपचपदी निवड झाल्यामुळे त्यांनी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, २८ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरूवात झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी २ एप्रिल ही शेवटची तारीख असून, ११ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येईल. १७ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून, १८ एप्रिल रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याचे तहसिलदार मुकेंश कांबळे यांनी सांगितले़
भायडी गण हा ओबीसी महिलेसाठी राखीव असून या जागेवर महिला ओबीसी उमेदवारच अर्ज दाखल करू शकतो तसेच केवळ आठ ते दहा महिन्यांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपा, कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाच्या वतीने उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी लागणारा खर्च कोणी करावा हा प्रश्न समोर उभा राहिला आहे़
१० ते १५ वर्ष तालुक्यावर भायडीची सत्ता होती. मात्र त्यानंतर भायडीची सत्ता गेली व जवखेडा व पिंपळगाव सुतारची सत्ता या तालुक्यावर आली होती. तरी सुध्दा भायडी या गणामध्ये कॉग्रेसचे कार्यक्रर्ते केशव जंजाळ यांच्या भावजय मनिषा जंजाळ यांनी या गणातून मोठ्या मताने विजय मिळविला होता. त्यामुळे या निवडणुकीत त्याची काय भूमिका राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Bhayyad Panchayat bye election announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.