भरधाव कारने दुचाकीस्वार दाम्पत्याला ५० फूट फरपटत नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:02 IST2021-05-01T04:02:11+5:302021-05-01T04:02:11+5:30
औरंगाबाद : रास्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वार दाम्पत्याला भरधाव कारने उडवल्यानंतर सुमारे ५० फुटांपर्यंत फरपटत नेले. या अपघातात दुचाकीवरील महिला ठार ...

भरधाव कारने दुचाकीस्वार दाम्पत्याला ५० फूट फरपटत नेले
औरंगाबाद : रास्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वार दाम्पत्याला भरधाव कारने उडवल्यानंतर सुमारे ५० फुटांपर्यंत फरपटत नेले. या अपघातात दुचाकीवरील महिला ठार झाली. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास हडको कॉर्नर ते टीव्ही सेंटर रस्त्यावरील सिद्धार्थ चौकाजवळ झाली.
सुनीता प्रकाश शेळके(४५, रा. हडको एन १३) असे मृताचे नाव आहे. यात पती प्रकाश कौतिकराव शेळके (५०) हे आणि त्यांना उडविणाऱ्या कारचा चालक अमोल मधुकर कीर्तीकर (२०, रा. शिवशंकर कॉलनी) हे जखमी झाले. सिद्धार्थ(चौकट) सामसूम रस्ता, वाहने सुसाट
लॉकडाऊनमुळे सध्या रस्त्यावर विनापरवानगी घराबाहेर वाहन नेता येत नाही. यामुळे शहरात रस्त्यांवर वाहनांची संख्या अत्यल्प आहे. विशेषत: रात्री रस्ते सामसूम असतात. सिमेंटचा सामसूम रस्ता पाहून कारचालक सुसाट जात असताना त्याला रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वार दाम्पत्याला वाचविता आले नाही आणि त्याने त्यांना सुमारे ५० फुटांपर्यंत फरपटत नेले.
(फोटोसह)