जागजी येथे भरदिवसा घरफोडी
By Admin | Updated: December 31, 2014 01:02 IST2014-12-31T00:59:16+5:302014-12-31T01:02:11+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील जागजी येथे मंगळवारी भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून रोख १५ हजार रूपयांसह सोन्याचे दागिने लंपास केले़

जागजी येथे भरदिवसा घरफोडी
उस्मानाबाद : तालुक्यातील जागजी येथे मंगळवारी भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून रोख १५ हजार रूपयांसह सोन्याचे दागिने लंपास केले़ भरदिवसा ही घटना घडल्याने जागजीसह परिसरात दहशत पसरली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे़
जागजी येथील सुंभा-मुरूम मार्गावरील पवणनगर चांगदेव राजेंद्र हाटकर यांचे घर आहे़ घरातील मंडळी मंगळवारी दुपारी शेतात व इतरत्र कामासाठी गेली होती़ घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ कपाटातील दोन तोळे सोने व रोख १५ हजार रूपये असा जवळपास ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़ राजेंद्र हाटकर हे घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला़ घटनास्थळी सपोनि दिगंबर शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेवून पंचनामा केला़ या प्रकरणी चांगदेव हाटकर यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, जिल्ह्यात शहरी भागासह इतरत्र चोऱ्याचे सत्र सुरू आहे़ त्यातच आता चोरट्यांनी जागजी येथे भरदिवसा घरफोडी करून अर्ध्या लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे़ तरी पोलिसांनी याकडे लक्ष देवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)