अ. भा. आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत शायन हिने जिंकले कास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:56 IST2019-02-02T00:56:05+5:302019-02-02T00:56:17+5:30

उदयपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत शायन पठाण हिने ऐतिहासिक कामगिरी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला कास्यपदक जिंकून दिले. शायन पठाण हिने ही कामगिरी महिलांच्या ८१ पेक्षा जास्त किलो वजन गटात केली.

A Bh Shayan won the bronze in the Inter-University Boxing Championships | अ. भा. आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत शायन हिने जिंकले कास्य

अ. भा. आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत शायन हिने जिंकले कास्य

औरंगाबाद : उदयपूर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत शायन पठाण हिने ऐतिहासिक कामगिरी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला कास्यपदक जिंकून दिले.
शायन पठाण हिने ही कामगिरी महिलांच्या ८१ पेक्षा जास्त किलो वजन गटात केली. शायन पठाण हिला एनआयएस बॉक्सिंग प्रशिक्षक अजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे, प्र. कुलगुरू प्रो. अशोक तेजनकर, कुलसचिव साधना पांडे, क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव व सिनेट सदस्य पंकज भारसाखळे, संदीप जगताप, रवींद्र माळी, लक्ष्मण कोळी आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

Web Title: A Bh Shayan won the bronze in the Inter-University Boxing Championships