खाते क्रमांकाअभावी मिळेना परीक्षा शुल्क माफीचा लाभ

By Admin | Updated: July 16, 2014 01:23 IST2014-07-16T00:01:14+5:302014-07-16T01:23:48+5:30

बीड : टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची २०१२- १३ मधील परीक्षा फी माफ करण्यात आलेली आहे. मात्र, खातेक्रमांक न कळविल्याने विद्यार्थी वंचितच राहिल्याची बाब पुढे आली आहे.

Benefits of waiving exemption of account number, examination fee waiver | खाते क्रमांकाअभावी मिळेना परीक्षा शुल्क माफीचा लाभ

खाते क्रमांकाअभावी मिळेना परीक्षा शुल्क माफीचा लाभ

बीड : टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची २०१२- १३ मधील परीक्षा फी माफ करण्यात आलेली आहे. मात्र, मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला खातेक्रमांक न कळविल्याने विद्यार्थी वंचितच राहिल्याची बाब पुढे आली आहे.
२०१२-१३ मध्ये जिल्ह्यात टंचाईस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर टंचाईग्रस्त गावांसाठी शासनाने विविध सवलती जाहीर केल्या होत्या. त्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी माफीच्या निर्णयाचाही समावेश होता. दहावीसाठी ३०० तर बारावीसाठी ३१५ रुपये इतके शुल्क आकारले होते. ते विद्यार्थ्यांना सरसकट परत केले जाणार होते. खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी शासनाने शिक्षण विभागाला ५४ लाख १४ हजार ४०० रुपयांचा निधीही पाठविला; पण त्यापैकी २८ लाख ५३ हजार ९०० रुपयांचे वाटप होऊ शकले आहे. उर्वरित निधी तसाच पडून आहे. जिल्ह्यातील १६२ शाळांमधील मुख्याध्यापनकांनी खाते क्रमांक कळविले आहेत. अद्याप १८८ शाळांनी केवळ खाते क्रमांक न दिल्याने विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षा फीच्या माफीचा लाभ पोहोचू शकला नाही. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी
टंचाईकाळातील मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसेल तरी ही लांच्छनास्पद बाब आहे. ज्या मुख्याध्यापकांनी खाते क्रमांक कळविले नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. खाते क्रमांक द्यायचे नसतील तर त्यांच्याकडून परीक्षा फी माफीचे शुल्क वसूल करावी, अशी मागणी मनविसेचे जिल्हाप्रमुख शैलेश जाधव यांनी केली. शुल्क परत करा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Benefits of waiving exemption of account number, examination fee waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.