शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या तत्कालीन सहायक कामगार आयुक्तांना निलंबित करण्याचा खंडपीठाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 15:00 IST

आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, उदगीर नगर परिषदेच्या सखोल चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

औरंगाबाद : उदगीर नगर परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन व इतर लाभ वितरणातील आर्थिक गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत, औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. एस. जी. डिगे यांनी लातूरचे तत्कालीन सहायक कामगार आयुक्त जैनाब काशीद यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य शासनास दिले. त्यांची विभागीय चौकशी करून खंडपीठात अहवाल दाखल करण्याचेही आदेश दिले.

त्याचप्रमाणे उदगीर नगर परिषदेने इतकी मोठी रक्कम सहायक कामगार आयुक्तांकडे पाठविली व ती रक्कम कामगारांना रोख वितरित केल्यासंदर्भात त्याचप्रमाणे कामगार न्यायालयाने कामगारांना किती रक्कम मंजूर केली होती, याबाबतही सखोल चौकशी करण्याचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, ४ मे रोजी चौकशी अहवाल खंडपीठात दाखल करण्याचाही आदेश खंडपीठाने त्यांना दिला आहे. चौकशी अहवालानुसार गुन्हे नोंद करण्याचे सुतोवाच खंडपीठाने अवमान याचिकेच्या सुनावणीप्रसंगी केले आहे.

काय आहे याचिका?उदगीर नगर परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन व इतर लाभ त्यांना देण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला होता. तरी नगर परिषदेने त्यांना वरील आर्थिक लाभ दिले नाहीत, म्हणून कर्मचाऱ्यांनी ॲड. राम शिंदे बोरोळकर यांच्यामार्फत खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. अवमान याचिकेच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन व इतर थकीत आर्थिक लाभापोटी लातूरच्या सहायक कामगार आयुक्तांकडे ४ कोटी ६४ लाख ५५ हजार ४८४ रुपये जमा केल्याचे उत्तर नगर परिषदेने दाखल केले. तर नगर परिषदेकडून केवळ एक कोटी ७७ लाख ४५ हजार २७६ रुपये एवढीच रक्कम प्राप्त झाली होती. ती रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात वाटप केल्याचे शपथपत्र सहायक कामगार आयुक्तांनी दाखल केले होते. यावरून सदर प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा युक्तिवाद ॲड. शिंदे यांनी केला.

‘अशा’ कृत्याकडे खंडपीठ डोळेझाक करू शकत नाहीसहायक कामगार आयुक्तांनी एक कोटी ७७ लाख ४५ हजार २७६ रुपये कामगारांना रोख वितरित केले, ही बाब (कृत्य) गंभीर स्वरूपाची आहे. अशा कृत्यांकडे खंडपीठ डोळेझाक करू शकत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच याचिकाकर्त्यांनी शपथपत्रावर सहायक कामगार आयुक्तांवर गंभीर आरोप केल्याचीही खंडपीठाने दखल घेतली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारी