शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

लाडक्या बहिणी खूष, पण महागाईचं काय? महिलांच्या जाहीरनाम्यात महागाई, सुरक्षिततेबाबत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 19:49 IST

सरकारने महागाईला आळा घालण्यासाठी ठोस कारवाई करावी असा सूर महिलांमध्ये आढळून येत आहे.

छत्रपती संभाजनीगर : सध्या लाडक्या बहिणी खूष आहेत. ऐन दिवाळीत त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपयेप्रमाणे पैसे जमा होत आहेत. पण वाढत्या महागाईनंही या लाडक्या बहिणी तेवढ्याच त्रस्त आहेत. इकडे शासनाचे पैसे मिळत असल्याचा आनंद आहे. पण महागाईच्या भस्मासुरामुळे त्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेलाच आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. २३ ला निकाल कळेल. येणारे कोणते सरकार असेल, त्या सरकारने महागाईला आळा घालण्यासाठी ठोस कारवाई करावी असा सूर महिलांमध्ये आढळून येत आहे. नव्या सरकारकडून महिलांच्या काय आहेत अपेक्षा या अनुषंगाने जाणू घेतलेल्या या प्रतिक्रिया :

दिवाळी चांगली होऊन जाईल, पण....नोव्हेंबर महिन्याचे पैसेही लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. त्यामुळे दिवाळी चांगली होऊन जाईल. पण महागाईसारखा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहेच. ही महागाई कमी करण्यावर येणाऱ्या सरकारने भर द्यायला हवा. गॅसचे वाढलेले दर तरी कमी व्हायला पाहिजे. आज सर्वच बाबतीत महागाई वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.- रोहिणी शेवाळे, सामाजिक कार्यकर्त्या

महिलांना आत्मसन्मानाने जगता आलं पाहिजेमहिलांना आत्मसन्मानाने जगता आलं पाहिजे. संविधानाने तिला दिलेल्या समानतेच्या अधिकाराची पायमल्ली होऊ देता कामा नये, हे माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. शिवाय महिलांच्या आरोग्याचा व रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने हाताळणारे सरकार असावे. एका अहवालात छत्रपती संभाजीनगर महिलांच्या दृष्टीने अत्यंत असुरक्षित असल्याचे दिसून आले. २० ऑक्टोबर रोजी महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करून जाहीरनामा तयार करण्यासाठी सजग महिला संघर्ष समितीची दुपारी १२:३० वा. एमआयटीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.- मंगल खिंवसरा, विद्रोही सामाजिक कार्यकर्त्या.

बलात्कार करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यावीशिव- फुले-शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली महिला असुरक्षित आहे. नराधमांच्या तावडीतून आता चिमुकल्या मुलीही सुटेनात. महिलांवर अन्याय- अत्याचार वा बलात्कार करणाऱ्यांना भर चौकात फाशी झाली पाहिजे. असं काही तरी करणारं सरकार असायला हवं, असं मला वाटतं. लाडक्या बहिणींना आता दीड हजार रु. मिळायला लागलेत, पण पैसे देणारे भाऊ स्वार्थी आहेत, ते कशासाठी पैसे देत आहेत, हे त्या ओळखून आहेत. देत आहेत, तर घेऊन टाका ही त्यांची भूमिका दिसते.- कांचन सदाशिवे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या.

मूलभूत गरजा पूर्ण करणारं सरकार हवं...हल्ली जातीपातीचं राजकारण खूप वाढलंय. ते थांबलं पाहिजे. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारं सरकार असावं असं मला वाटतं. विशेषत: महिलांच्या संरक्षणाचा फार मोठा मुद्दा आहे. महिलांना मान द्यायलाच पाहिजे. मात्र आजही तिच्यावर अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. हे वेळीच थांबवणारं सरकार हवं. आता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळायला लागले, म्हणून त्या खुश आहेत. पण ज्यांना काही मिळालेलं नाही, त्या दोडक्या बहिणींचं काय? आणि कुणी काही दिलं तर घेऊन टाकलं जातं; पण महिलांचे अन्य प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे आहेत.- क्रांती कुलकर्णी-देशमुख, निवृत्त मनपा शिक्षिका

कष्टकरी कामगार महिलांनाही हवाय न्याय...महिलांची सुरक्षा हा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. कष्टकरी कामगार महिलांची पिळवणूक थांबवली गेली पाहिजे. ती जिथे काम करते, तेथे ती मानसिक, शारीरिक छळाला बळी पडते. उमेद अभियान, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी या महिलांचे प्रश्न सुटता सुटत नाहीत. दुसरीकडे महागाईने या महिला होरपळून निघत आहेत. त्यांच्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करून भरघोस मदत दिली गेली पाहिजे. एकीकडे लाडक्या बहिणी सरकारचे दीड हजार रुपये आनंदाने घेत आहेत, पण लगेच महागाई वाढत असल्याने त्या पुरत्या होरपळल्या जात आहेत. हे प्रश्न सरकारने सोडवले पाहिजेत.- कॉ. मंगल ठोंबरे, कामगार नेत्या

अडगळीतल्या रस्त्यांवरही कॅमेरे बसवा.....महिलांच्या सुरक्षिततेबद्दल खूप चिंताजनक परिस्थिती आहे. मी शिकायला विदेशात होते. तिथं अडगळीतल्या रस्त्यांवरही डिव्हाइसची सोय असायची. सायरन वाजायचा. तशी सोय आपल्याकडेही व्हायला हवी. वर्किंग वुमेनला अजून सुरक्षितता द्यायला हवी. तिला रात्री घरापर्यंत पोहचवण्याची सोय केली गेली पाहिजे. बस, रेल्वेमध्ये अधिक आरक्षण मिळायला हवे. संविधानाने दिलेला ‘इक्वल पे फॉर इक्वल वर्क’ हे सूत्र तंतोतंतपणे अंमलात यायला हवे.- ॲड. ममता झाल्टे, विधिज्ञ, जिल्हा कोर्ट

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWomenमहिलाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा