सिल्लोड तालुक्यात ९१ शाळांची वाजली घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:05 IST2021-07-16T04:05:12+5:302021-07-16T04:05:12+5:30
तालुक्यातील केंद्राअंतर्गत सुरू झालेल्या शाळांमध्ये सिल्लोड ६, निल्लोड ६, पालोद ५, राहिमाबाद ७, अंधारी ४, केऱ्हाळा २, बोरगाव बाजार ...

सिल्लोड तालुक्यात ९१ शाळांची वाजली घंटा
तालुक्यातील केंद्राअंतर्गत सुरू झालेल्या शाळांमध्ये सिल्लोड ६, निल्लोड ६, पालोद ५, राहिमाबाद ७, अंधारी ४, केऱ्हाळा २, बोरगाव बाजार ४. आमठाणा १५, अभई ७, अजिंठा ३, उंडणगाव ६, पानवडोद ४, भराडी ११, शिवना ११ अशा एकूण १३९ पैकी ९१ शाळा सुरू झाल्या. बहुतांश शाळेत पहिल्याच दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, तर काही ठिकाणी २५ टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. साधारण दीड वर्षांपासून दुरावलेले मित्र एकत्र आल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झाला होता. शाळांमध्ये निर्जंतुक फवारणी करण्यात आली होती.
---
फोटो : भराडी येथील श्री. सरस्वती भुवन प्रशालेत पहिल्याच दिवशी हजर झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना विद्यार्थी.
150721\img-20210715-wa0221.jpg
भराडी येथील श्री. सरस्वती भुवन प्रशालेत पहिल्याच दिवशी हजर झालेल्या विद्यार्थ्यासमवेत संवाद साधताना विद्यार्थी