शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

बदनामीच्या भीतीने खुनाचा बनाव!

By admin | Updated: October 2, 2014 00:51 IST

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचे रहस्य उलगडले आहे.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचे रहस्य उलगडले आहे. तिचा पतीने खून केलेला नाही, तर अनैतिक संबंधातून तिने पतीच्या चुलत भावाबरोबरच पलायन केले आहे. ती पळून गेल्याने आता आपली बदनामी होईल, या भीतीपोटी अन् बदनामी टाळण्यासाठी पतीने ‘मी पत्नीचा खून केला’ असा बनाव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. २८ सप्टेंबर रोजी महानंदा पुंडलिक गुंजुटे (२२, रा.दत्तनगर, रांजणगाव शेणपुंजी) ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज ठाण्यात दिली होती. तक्रार दिल्यानंतर पुंडलिक ३० सप्टेंबरला आपल्या मूळ गावी चाकूरला गेला होता. त्याने सासऱ्याला महानंदा गायब झाल्याची माहिती दिली. संतप्त सासऱ्याने त्यास जबर मारहाण केली. बदनामी होऊ नये, यासाठी त्याने नातेवाईकांना आपण महानंदाचा खून करून प्रेत रांजणगाव शेणपुंजी येथे नालीत टाकल्याची थाप मारली. महानंदाचा खून झाल्याचे समजताच नातेवाईकांनी त्यास चाकूर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यांनी माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना देऊन पुंडलिकने प्रेत नालीत टाकल्याचे सांगितले होते. मात्र मृतदेह सापडला नाही.बदनामी व महानंदाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्यामुळे पुंडलिकने पत्नीचा तान्हाजीच्या मदतीने खून केल्याची थाप मारली होती. सध्या निवडणूक रणधुमाळीत पोलीस प्रशासन व्यस्त असून, पुंडलिकच्या थापेमुळे दोन्ही पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांची न झालेल्या खुनाचा शोध लावण्यासाठी चांगलीच दमछाक झाली. सध्या तान्हाजीचे मोबाईल लोकेशन हैदराबाद येथे मिळत असल्यामुळे महानंदा व तान्हाजी हे दोघेही सोबत असल्याचे पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी सांगितले. हैदराबादला पथक पाठवून या दोघांना ताब्यात घेतले जाईल.