शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'सुरुवात मायबोलीत...'; मुक्तीसंग्राम दिनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मराठीत दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 13:20 IST

न्यायायाधीश, वकिलांनी समन्वयाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा; सरन्यायाधीश डाॅ. धनंजय चंद्रचूड यांचे आग्रही प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर : भाषणाची सुरुवात मायबोलीत करतो असे म्हणत सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डाॅ. धनंजय चंद्रचूड यांनी मराठवाड्यातील संत, स्वातंत्र्यसैनिक आणि येथील समृद्धीचा उल्ल्खेख करत अस्खलित मराठीत मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच  सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे हा न्याय व्यवस्थेचा मूळ उद्देश आहे. घटनाकारांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सद्सद विवेक बुद्धीला अनुसरून, न्यायाधीश आणि वकिलांनी याेग्य समन्वयाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आग्रही प्रतिपादन सरन्यायाधीश डाॅ. चंद्रचूड यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त उच्च न्यायालय प्रशानाच्या वतीने एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात आयाेजित कार्यक्रमात सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय न्या. अभय ओक आणि न्या. दीपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला, औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठतम न्यायमूर्ती रवींद्र घुगे, ॲडव्हाेकेट जनरल डाॅ. बिरेंद्र सराफ, बार काैन्सिलचे उपाध्यक्ष उदय वारुंजीकर, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष नरसिंग जाधव व सचिव राधाकृष्ण इंगाेले यांची मंचावर उपस्थिती हाेती.

समृद्धी सचिन कुलकर्णी हिने स्वागत गीत गायले. ॲड. चैतन्य धारूरकर यांनी सूत्रसंचालन केले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी आभार मानले. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील, राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती एस. एस. शिंदे, औरंगाबाद खंडपीठ, नागपूर आणि गोवा खंडपीठातील न्यायमूर्ती, ज्येष्ठ विधिज्ञ, वकील आणि विधि शाखेचे विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

भाषणाची सुरुवात केली मराठीत‘न्याय व्यवस्था बळकट करण्यासाठी वकील आणि न्यायधीशांमध्ये समन्वय वाढविणे’ या विषयाची मांडणी करताना प्रारंभी न्या. चंद्रचूड यांनी मायबोलीत भाषणाची सुरुवात केली. मराठवाड्यातील संत परंपरेचा, ज्याेतिर्लिंगाचा उल्लेख करीत मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यवीरांना व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या त्यागाच्या निष्ठेचे फळ आपण आज स्वातंत्र्याच्या रूपाने चाखताे आहोत, असे ते म्हणाले.

न्यायव्यवस्थेने तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरजते म्हणाले की, न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारा प्रत्येक घटक न्यायव्यवस्थेचा अविभाज्य अंग आहे. वकील आणि न्यायमूर्तींनी परस्परांचा सन्मान करावा. काेणतेही काम करताना ते सद्सदविवेक बुद्धीला स्मरून केले तर उद्दिष्टपूर्ती हाेते. हाच नियम न्यायव्यवस्थेलाही लागू पडताे. न्यायव्यवस्थेने तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. सर्वाेच्च न्यायालयाचे सुमारे ३६ हजार निवाडे ‘ ईएसईआर’प्रणालीवर मराठीसह देशाच्या विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ वकिलांनी घ्यावा. तसेच ई-फायलिंग, ई-सेवा केंद्र आणि विधि विद्यापीठे ही विधि शिक्षणाची आवश्यक अंग आहेत.

विश्वासार्हता हा न्याय व्यवस्थेचा आत्मातरुण वकील व्यवसायात येत आहे. त्यांना वरिष्ठ वकिलांनी वेळाेवेळी मार्गदर्शन करावे. विधि विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे कार्य करून तरुण वकिलांना प्रशिक्षित करावे. न्याय व्यवस्थेत जवळपास ५० टक्के महिला वकील आहेत. त्यांना आवश्यक त्या साेयी-सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. तरुण वकिलांचा दृष्टिकाेन व्यापक, वैविध्यपूर्ण व सर्वसमावेशक असावा. काळा काेट व गाऊन प्रत्येकवेळी तुम्हाला तुमच्या कर्तव्याची आठवण करून देताे. विश्वासार्हता हा न्याय व्यवस्थेचा आत्मा आहे याचे स्मरण ठेवा, असे ते शेवटी म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा