शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला उत्साही वातावरणात सुरुवात

By admin | Updated: September 26, 2014 01:56 IST

औरंगाबाद : घरोघरी घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला गुरुवारी प्रारंभ झाला.

औरंगाबाद : घरोघरी घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला गुरुवारी प्रारंभ झाला. विविध भागांतील सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना वाजतगाजत करण्यात आली. देवीचे भक्त पुढील आठ दिवस आता जागर करणार आहेत. पहिल्या माळेपासून शहरात रास दांडियालाही सुरुवात झाली. नवरात्रोत्सवानिमित्त सकाळपासूनच लगबग सुरू झाली होती. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आज घटस्थापनेचा मुहूर्त होता. मात्र, बहुतांश भाविकांनी घरी सकाळीच घटस्थापना केली. शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा येथील देवीच्या मंदिरात पहाटे ३ वाजेपासून विधिवत महापूजेला सुरुवात झाली. सकाळी ६ वाजता घटस्थापना झाली आणि ७.३० वा. मंदिराचे विश्वस्त दानवे परिवाराच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रती माहूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको एन-९ येथील रेणुकामाता देवीच्या मंदिरातही देवीची पूजा व घटस्थापना करण्यात आली. हर्सूल येथील हरसिद्धी देवीच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला.दुपारी भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने रंगारगल्ली येथील हिंगुलांबिका मातेच्या मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध भागांतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात रात्री उशिरापर्यंत देवीची स्थापना करण्यात आली. जिल्हा परिषद मैदानावर देवीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या होत्या. यात विविध मूर्तिकारांनी तयार केलेल्या १० इंचापासून ते १० फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. दुर्गामाता, अंबामाता, सप्तशृंगी देवी, रेणुकादेवीचा मुखवटा अशा विविध रूपांतील देवीच्या मूर्ती एकाच ठिकाणी बघावयास मिळत होत्या. आकाशपाळणे पहिल्या दिवशी राहिले बंद कर्णपुरा यात्रेत मनोरंजनाचे खेळ घेऊन आलेल्या ३२ व्यावसायिकांना विविध विभागांची परवानगी मिळविण्यासाठी दिवसभर धावपळ करावी लागली. पीडब्ल्यूडीची परवानगी न मिळाल्याने पहिल्या दिवशी यात्रेतील आकाशपाळणे व्यावसायिकांना बंद ठेवावे लागले. या व्यावसायिकांना लाईट इन्स्पेक्टर, अग्निशामक दल, छावणी पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी लागते. काही खेळण्यांना रात्री उशिरा वीजपुरवठा उपलब्ध झाला होता. एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळाव्यात, अशी मागणी व्यावसायिकांनी केली.