बीडची मुक्ता मगरे महाराष्ट्राच्या संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:46 IST2018-02-24T00:45:45+5:302018-02-24T00:46:11+5:30
राजकोट येथे २४ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान होणाºया २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय आंतरराज्य वनडे पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ पुणे येथे शुक्रवारी जाहीर झाला आहे. स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाची धुरा असेल. बीडच्या मुक्ता मगरे हिचा महाराष्ट्राच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

बीडची मुक्ता मगरे महाराष्ट्राच्या संघात
औरंगाबाद : राजकोट येथे २४ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान होणाºया २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय आंतरराज्य वनडे पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ पुणे येथे शुक्रवारी जाहीर झाला आहे. स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाची धुरा असेल. बीडच्या मुक्ता मगरे हिचा महाराष्ट्राच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा संघ : स्मृती मानधना (कर्णधार), देविका वैद्य, तेजल हसबनीस, मुक्ता मगरे, शिवाली शिंदे (यष्टिरक्षक), माया सोनवणे, निकिता भोर, उत्कर्षा पवार, प्रियंका घोडके, चार्मी गवई, शिवाली बी., आदिती गायकवाड, श्रद्धार पोखरकर, वैष्णवी माशालकर, सुषमा पाटील.
महाराष्ट्राचा पहिला सामना २४ रोजी गुजरात, २६ रोजी बडोदा, २७ रोजी मुंबई, १ मार्च रोजी सौराष्ट्र संघाविरुद्ध रंगणार आहे.