बीड, माजलगाव, शिरूर, आष्टीत दमदार पाऊस
By Admin | Updated: June 2, 2017 00:19 IST2017-06-02T00:10:14+5:302017-06-02T00:19:28+5:30
बीड : बीड, माजलगाव, शिरुर कासार आणि आष्टी परिसरात गुरुवारी दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली.

बीड, माजलगाव, शिरूर, आष्टीत दमदार पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड, माजलगाव, शिरुर कासार आणि आष्टी परिसरात गुरुवारी दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली. बीड शहरात झालेल्या पावसामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. तसेच बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने बस चालकांसह प्रवाशांचे हाल झाले.
गुरुवारी दुपारी अचानक ढग दाटून आले होते. दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास दमदार पाऊस कोसळला. यामुळे खरीप पेरणीला सुरुवात होईल, अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. आष्टी तालुक्यातील कडा, माजलगाव परिसरातही दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे.