शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशबंदीचा वेळ संपताच बीड बायपास बनला अधिक धोकादायक; पुढे जाण्यासाठी जडवाहनचालकांमध्ये लागली स्पर्धा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:23 IST

बीड बायपासवरील प्रवेशबंदीचा वेळ संपताच ट्रक, हायवासह अन्य अवजड वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरू होते.

ठळक मुद्देबीड बायपासवर महिनाभरात अपघातात पाच जणांचे बळी गेले.जडवाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत प्रवेशबंदी केली. ११ वाजेनंतर जडवाहनांसाठी  मार्ग खुला होताच जडवाहनचालकांनी वाहने वेगात दामटली.

औरंगाबाद : बीड बायपासवरील प्रवेशबंदीचा वेळ संपताच ट्रक, हायवासह अन्य अवजड वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरू होते. अन्य वाहनचालकांसाठी ते रस्ताच सोडत नसल्याने या मार्गावरील अपघाताचा धोका वाढल्याचे सोमवारी दिसून आले. विशेष म्हणजे बायपासवरील सुसाट राँगसाईड वाहनचालकांची संख्या ‘जैसे थे’ आहे.

बीड बायपासवर महिनाभरात अपघातात पाच जणांचे बळी गेले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी २ ते ९ सप्टेंबरदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर जडवाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत प्रवेशबंदी केली. प्रवेशबंदीच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ८ ते ११ पर्यंत दोन्ही बाजूंनी पोलिसांनी अवजड वाहने रोखली. ११ वाजेनंतर जडवाहनांसाठी  मार्ग खुला होताच जडवाहनचालकांनी वाहने वेगात दामटली. या रस्त्यावरील दोन्ही लेनचा ताबा घेत जडवाहनचालकांमध्ये पुढे निघण्याची स्पर्धाच सुरू झाली.

या स्पर्धेत जडवाहनचालक अन्य वाहनांसाठी लेनच शिल्लक ठेवत नाही, परिणामी दुचाकीस्वार आणि कार, रिक्षासारखे छोटे वाहनचालक जीव धोक्यात घालून दोन वाहनांमधील अरुंद फटीतून पुढे निघण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सोमवारी सदर प्रतिनिधीला आढळले. बीड बायपास रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन केल्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर यांनी रविवारी आणि सोमवारीही बायपासची पाहणी केली. वाहतूक व्यवस्थेत काय फरक पडला, तेथील बेशिस्त आणि राँगसाईड वाहनचालकांवर कारवाईचे आदेश त्यांनी पोलीस निरीक्षकांना दिले. यावेळी पोलीस निरीक्षक भारत काकडे, अशोक मुदिराज आणि हेमंत गुरमे यांची उपस्थिती होती. 

दोन्ही बाजूने दुपारी अडीचपर्यंत वाहनांच्या रांगासकाळी रोखलेली वाहतूक पुढे बीड बायपासवरून जाण्यासाठी तब्बल तीन तास लागले. झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम चौक आणि लिंक रोड ते झाल्टा फाटा या दोन्ही मार्गांवर सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत जडवाहने रांगेत धावत होती. तेव्हा दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून वाहने चालवीत होते. २ वाजेनंतर बीड बायपासवरील जडवाहनांची संख्या कमी झाली. मग रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

राँगसाईड सुसाटबीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र अधिसूचना काढून जडवाहनांना प्रवेशबंदी केली. असे असताना या मार्गावरील राँगसाईड वाहने पळविणाऱ्यांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट राँगसाईड सुसाट वाहने पळविणाऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. यात रिक्षाचालक, दुचाकीचालकांसोबत चारचाकी कारचालकही दिसले. राँगसाईड वाहनचालकांवर सकाळी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई  केली.

वेग कमी करण्यासाठी लावले बॅरिकेडस् बीड बायपासवर ठिकठिकाणी बॅरिकेडस् लावले आहेत. यामुळे वाहनचालकांना वेग कमी करून झिग-झॅग पद्धतीने वाहन पुढे न्यावे लागते आणि अपघात टळतो. अपघातप्रवण ठिकाणीच हे बॅरिकेडस् लावण्यात आले.- भारत काकडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसAccidentअपघातDeathमृत्यू