साडीत खुललं प्रार्थना बेहरेचे सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:02 IST2021-03-16T04:02:06+5:302021-03-16T04:02:06+5:30

अभिनेत्री प्रार्थना बेहरे आपल्या वेगवेगळ्या फोटोशूटवरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. तिने नुकतेच एक फोटोशूट शेअर केले आहे. यात ...

The beauty of open prayer deaf in saree | साडीत खुललं प्रार्थना बेहरेचे सौंदर्य

साडीत खुललं प्रार्थना बेहरेचे सौंदर्य

अभिनेत्री प्रार्थना बेहरे आपल्या वेगवेगळ्या फोटोशूटवरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. तिने नुकतेच एक फोटोशूट शेअर केले आहे. यात ती साडीत दिसत असून तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. फोटोमधील गुलाबी रंगाच्या साडीत प्रार्थना खूपच सुंदर दिसते आहे. नेहमीप्रमाणे तिच्या फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना आवडले असून त्यांनी यावर स्तुती करणाऱ्या अनेक कमेंट केल्या आहेत. काही वेळातच हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रार्थना लवकरच ‘छूमंतर’ या मराठी सिनेमात दिसणार आहे.

‘आदिपुरुष’ सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी

आपल्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्याने जादू करणारी तृप्ती तोरडमल आता थेट बॉलिवूडचा बिग बजेट समजल्या जाणाऱ्या ‘आदिपुरुष’ सिनेमात झळकणार आहे. खुद्द तृप्तीनेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर सिनेमाच्या मुहूर्ताची सुरुवात झाल्याचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिच्या चाहत्यांनी देखील तिला या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सिनेमातल्या तिच्या भूमिकेविषयी फारशी माहिती समोर आली नाही. मात्र, पुन्हा एकदा तिला रुपेरी पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी नक्कीच एक मनोरंजनाची पर्वणीच असणार आहे.

रिंकूच्या अदांनी चाहते घायाळ

नुकताच अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती साडीमध्ये दिसत आहे. रिंकू गुलाबी रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत आहे. यातील तिच्या अदांमुळे चाहते घायाळ झाले आहेत. विशेष म्हणजे, फोटोसह तिने दिलेलं कॅप्शन सुद्धा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, सत्य नेहमी डोळ्यात दिसते. काही दिवसांपूर्वी याच साडीत तिने ब्लॅक अँड व्हाइट व्हिडिओ शेअर केला होता. यावेळी तिने लिहिले, हास्य ही खूप चांगली गोष्ट आहे जी कधीही परिधान करू शकतो. तिच्या या व्हिडिओलाही चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

Web Title: The beauty of open prayer deaf in saree