उसाच्या बैलगाडीवरून मारहाण

By Admin | Updated: February 18, 2015 00:42 IST2015-02-18T00:34:08+5:302015-02-18T00:42:29+5:30

लातूर : ‘उसाच्या बैलगाडी पुढे माझी, मागे तुझी’ या कारणावरुन तुंबळ हणामारी झाल्याची घटना मांजरा कारखान्याच्या पाटीनजीक सोमवारी दुपारी घडली़

Beating through a bullock cart | उसाच्या बैलगाडीवरून मारहाण

उसाच्या बैलगाडीवरून मारहाण


लातूर : ‘उसाच्या बैलगाडी पुढे माझी, मागे तुझी’ या कारणावरुन तुंबळ हणामारी झाल्याची घटना मांजरा कारखान्याच्या पाटीनजीक सोमवारी दुपारी घडली़
लातूर तालुक्यातील गंगापूर येथील जगन्नाथ गंगाराम मोरे व बाबू रंगनाथ गिंड व अन्य दोघांत सोमवारी दुपारच्या सुमारास मांजरा कारखाना पाटीजवळ उसाची बैलगाडी माझी पुढे, तुझी मागे घेण्याच्या कारणावरुन जबर मारहाण झाली़ जगन्नाथ मोरे यांना बाबू रंगनाथ गिंड व अन्य दोघांनी माझी बैलगाडी पुढे घेऊ दे म्हणून दमदाटी केली़ शिवीगाळ केली़ तसेच लाथाबुक्याने मारहाण केली़ बैलगाडीच्या लोखंडी खिळ डोक्यात घालून गंभीर जखमी केले़ डोके फुटल्याने मोरे गंभीर जखमी झाले, असे जगन्नाथ मोरे यांनी लातूर एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ त्यानुसार बाबू रंगनाथ गिंड व अन्य दोघांविरुद्ध कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
फिर्यादी जगन्नाथ मोरे व आरोपी बाबू रंगनाथ गिंड हे दोघेही गंगापूरचे आहेत़ बैलगाडीद्वारे कारखान्यावर ऊस घेऊन जाण्याचे दोघेही काम करतात़ आपापल्या बैलगाड्या पुढे घेण्याच्या कारणावरुन या दोघांत मारहाण झाली़

Web Title: Beating through a bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.