मुलास शिवीगाळ करणाऱ्या पित्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:05 IST2021-01-03T04:05:51+5:302021-01-03T04:05:51+5:30

वडगावातील घटना : मुलाच्या दोघा मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज महानगर : मुलास शिवीगाळ करणाऱ्या पित्यास मुलाच्या दोघा मित्रांनी ...

Beating the father who abused the child | मुलास शिवीगाळ करणाऱ्या पित्यास मारहाण

मुलास शिवीगाळ करणाऱ्या पित्यास मारहाण

वडगावातील घटना : मुलाच्या दोघा मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूज महानगर : मुलास शिवीगाळ करणाऱ्या पित्यास मुलाच्या दोघा मित्रांनी मारहाण करून डोके फोडल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वडगावात घडली. या प्रकरणी दोघा भावंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब जगन्नाथ सौदागर हे शुक्रवारी सायंकाळी मुलगा अनिकेत यास दुसऱ्या मुलासोबत विनाकारण फिरु नको, आज सुटी असून घरात आराम कर, असे म्हणून त्यास शिवीगाळ करीत होते. यावेळी अनिकेतचे मित्र सुहास पवार व त्याचा भाऊ सुनील पवार (दोघेही रा. वडगाव) हे घटनास्थळी आले व त्यांनी बाबासाहेब यांना अनिकेतला शिवीगाळ का करता, असा जाब विचारला व सुहासने लाकडी दांडा मारुन बाबासाहेब यांचे डोके फोडले तर त्याचा भाऊ सुनील यानेही शिवीगाळ करुन बाबासाहेब यांना मारहाण केली. या मारहाणीत डोके फुटल्याने बाबासाहेब रक्ताच्या थारोळ्यात खाली पडताच मारहाण करणारे दोघेही फरार झाले. यानंतर बाबासाहेब सौदागर यांना त्यांच्या पत्नीने पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या मारहाणप्रकरणी सुहास पवार व सुनील पवार या भावंडाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पो.ना.जाधव हे करीत आहेत.

--------------------

Web Title: Beating the father who abused the child