किरकोळ कारणावरून रॉडने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:13+5:302020-11-12T07:28:13+5:30
================ बिअर शॉपी व दारूचे दुकान फोडले औरंगाबाद : शहरात दुकानांचे शटर उचकटून चोरी करणारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. ...

किरकोळ कारणावरून रॉडने मारहाण
================
बिअर शॉपी व दारूचे दुकान फोडले
औरंगाबाद : शहरात दुकानांचे शटर उचकटून चोरी करणारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. चोरट्यांनी एपीआय कॉर्नर येथील बिअर शॉपी आणि चिकलठाणा येथील दारू दुकानकडून रोकड लंपास केल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुकुंदवाडी येथील रहिवासी अनिल अंबादास साळवे यांची एपीआय कॉर्नर येथे बिअर शॉपी आहे. ८ नोव्हेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे बिअर शॉपीचे शटर लॉक करून ते घरी गेले. नंतर चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून ४० हजार रुपयांची रोकड पळविली. दुसऱ्या दिवशी साळवे यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक घायाळ तपास करीत आहेत.
अन्य एका घटनेत चोरट्यानी चिकलठाणा येथील द्वारकाधीश कॉम्प्लेक्समधील देशी दारू दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील १० ते १२ हजारांची रोकड पळविली. ही घटना ९ रोजी सकाळी समोर आली. या प्रकरणी जयनारायण शंकरलाल जैस्वाल यांनी एमआय डी सी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.