दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:02 IST2021-01-10T04:02:01+5:302021-01-10T04:02:01+5:30

======================= ६ जनावरांची मुक्तता औरंगाबाद : सिल्लेखाना , बडा तकिया येथे चोरट्या मार्गाने आणलेली सहा गोऱ्हे आणि बैल ...

Beaten for not paying for alcohol | दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण

दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण

=======================

६ जनावरांची मुक्तता

औरंगाबाद : सिल्लेखाना , बडा तकिया येथे चोरट्या मार्गाने आणलेली सहा गोऱ्हे आणि बैल क्रांतीचौक पोलिसांनी ७ जानेवारी रात्री मुक्त केली. यावेळी पोलिसांना पाहून पळून गेलेल्या दोन अनोळखी आरोपीविरुद्ध पोलीस हवालदार मटका नामदेव बोबडे यांनी गुन्हा नोंदविला. फौजदार एम. गायकवाड तपास करीत आहेत.

===(=====================

महिलेची सोशल मीडियावर बदनामी

औरंगाबाद : ओळखीच्या महिलेचे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडून तिच्या चारित्र्याबद्दल वाईट मेसेज पाठविणाऱ्या आरोपी शेख वाजेद शेख जावेद याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. सायबर पोलिसांना याविषयी तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी तपास करून आरोपी शेख वाजेदला पकडून बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले.

=========================

जीप चालकाविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : जळगाव रोडवर ५ जानेवारी रोजी रात्री दुचाकीस्वारांना उडवून शुभम लोखंडे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी बोलेरो जीप चालकाविरुद्ध( एम एच ०४- एचडी ६८८५) गुन्हा नोंदविला. या घटनेत हर्षद ऊर्फ रोहित गडवे हा जखमी झाला होता.

========================

Web Title: Beaten for not paying for alcohol