बीअंँडसीला ४२ रस्ते हस्तांतरित होणार
By Admin | Updated: August 6, 2014 02:14 IST2014-08-06T00:48:03+5:302014-08-06T02:14:20+5:30
जालना : जिल्हा परिषदेकडे देखभाल दुरुस्तीसाठी असलेले प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाचे ४२ रस्ते लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केले जाणार आहेत.

बीअंँडसीला ४२ रस्ते हस्तांतरित होणार
जालना : जिल्हा परिषदेकडे देखभाल दुरुस्तीसाठी असलेले प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाचे ४२ रस्ते लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केले जाणार आहेत.
जिल्हा अंतर्गत प्रमुख मार्ग दर्जाचे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याकडेच देखभाल ु दुरुस्तीसाठी असावेत असा निर्णय ७ फेबु्रवारी २०१३ राज्य सरकारने घेतला होता. त्या अनुषंगानेच सार्वजनिक बांधकाम विभागाने १० जुलै २०१३ रोजी त्या शासन निर्णया संदर्भात जिल्हा परिषदेकडे पत्र पाठवून पाठपुरावा केला.
त्यानुसारच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या हद्दीतील एकूण ४२ रस्ते आता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित केले जाणार आहे. या अनुषांगने एक ठराव ३१ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतून मंजूर करण्यात आला. तो सोपास्कार आता पूर्ण झाल्याने हे रस्ते आता बांधकाम खात्याकडे लवकरच वर्ग होतील अशी चिन्हे आहेत.
हस्तांतरित केल्या जाणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्ग शेलूद - पिंपळगाव रेणुकाई, कोठा, करंजगाव, कल्याणी, वाकडी,वसई, आव्हाना ते मालखेडा हा २१६ राज्य मार्गाच्या ४२ किलो मीटरचा समावेश आहे.
नळणी बुद्रूक - खापरखेडा- तपोवन- अंबगाव ते टेंभूर्णी १३.४०, महेगाव- धावडा- पोखरी- वडोतांगडा- हिसोडा - जळगाव सपकाळ- सुरंगळी- पळसखेडा- वरुड बु.- गोळेगाव- वालसा असा ३९ किमीचा, आडगाव- आन्वा-वाकडी हा २८ किमीचा बरंजळा - जानेफळ- बोरगाव- भारज- वरुड हा ३२ किमीचा कायगाव- गोषेगाव- हसनाबाद हा १० किमीचा, खडकवाडी- सोमठाणा हा २० किमीचा, शेलगाव- नजिक पांगरी- केळीगव्हाण- उज्जैनपुरी- पीरपिंपळगाव मार्गे वंजार उम्रद हा ३३ किमीचा,डोणगाव-असरखेड- निवडुंगा ते पाथ्रुड हा ६० किमीचा, भाटेपुरी- रामनगर- नेराखेडा ते मानेगाव हा २१ किमीचा, वाटूर- जयपूर- बेलोरा- वझर सरकटे हा ३२ किमीचा, देवठाणा- मंठा ते ईटोली हा ४५ किमीचा, वायाळ पांगरी- ते मालकिनी हा ११ किमीचा, नेर ते टाकरवन- मानेगाव हा ११ किमीचा, लोणार भायगाव- आलमगाव ते हिवरा रोषणगाव हा ४९ किमीचा, जालना वळण रस्ता ते दरेगाव- ढोकसाळपर्यंत १९ किमीपर्यंत देवगाव ते मालेगाव १३ किमीचा, डामरुळ ते रोहिलागड ६ किमीचा, कोळी शिरसगाव ते सुखापुरी- तीर्थपुरी- अंतवारवालीटेंभी ४६ किमीचा, रामसगाव ते मंगरुळ हा २० किमीचा गणपती मंदिर ते वाघलेखडा २७ किमीचा, राणीउंचेगाव ते रांजणी हा १७ किमीचा, केहाळ ते पाडळदुधा हा २२ किमीचा, रायपूर ते शेलगाव, घोन्सीतांडा ते येणोरा, कुंभारपिंंपळगाव ते लोणीफाटा, अकोला ते बावणपांगरी, हरपाळा ते चांदोळधार, पांगरी शिवणगाव ते सातोना- देवगाव धनगर, सातोना ते आष्टी, आष्टसोमदेव ते चिंचोली, वडगाव ते घोडेगाव, सोयगाव देवी ते खडके जवळखेडा, चिंचोली ते जीवरंग टाकळी, टेंभूर्णी ते सिपोरा, राजेगाव ते बोररांजणी, रामसगाव ते नाथनगर, जांबसमर्थ ते रांजणी, दैठणा ते आष्टी, पिंपळगाव सुतार ते चिंचोली हे रस्ते हस्तांतरित होणार आहेत. (प्रतिनिधी)