बारमधील बिलावरून चौघांना बेदम मारहाण

By Admin | Updated: April 28, 2015 00:28 IST2015-04-28T00:22:14+5:302015-04-28T00:28:43+5:30

उस्मानाबाद : बारमधील बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांना काठ्या, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी

Beagle beat | बारमधील बिलावरून चौघांना बेदम मारहाण

बारमधील बिलावरून चौघांना बेदम मारहाण


उस्मानाबाद : बारमधील बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांना काठ्या, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दहा जणाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास शहरातील आठवडी बाजार परिसरात असलेल्या बारसमोर घडली़
पोलिसांनी सांगितले की, शहरातील आठवडी बाजार परिसरात असलेल्या फ्रेन्डस बारमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास सांजा येथील दहा जणांनी मिळून गुरू बारमध्ये बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या तक्रारीचा राग मनात धरून गणेश शामराव निंबाळकर, पद्मसिंह निंबाळकर, चेतन चाकोते, तुषार निंबाळकर या चौघांना लोखंडी रॉड, काठ्या, दगडांनी बेदम मारहाण केली़ या मारहाणीत वरील चौघेही गंभीर जखमी झाले़ या प्रकरणी गणेश शामराव निंबाळकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ गणेश निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून श्रीकांत शिवाजी सूर्यवंशी, रणजित सुभाष सूर्यवंशी, संतोष शिवाजी सूर्यवंशी, बळीराम रमेश सूर्यवंशी, आनंद धनंजय सूर्यवंशी,छोट्या सावंत, सागर पडवळ, अक्षय पडवळ, उदय सूर्यवंशी, किसन अंगठकर या दहा जणाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि राजेंद्र बनसोडे हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Beagle beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.