बीडकरांनी अनुभवली कडक सुरक्षा यंत्रणा

By Admin | Updated: October 5, 2014 00:49 IST2014-10-05T00:36:25+5:302014-10-05T00:49:51+5:30

शिरीष शिंदे , बीड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीड येथे सभा होणार असल्याने पोलीस प्रशासन गेल्या चार दिवसांपासून कामाला लागले होते. तसेच स्पेशल प्रोटेक्शन गु्रप मार्फत सभेच्या

Beadkar experienced strong security mechanisms | बीडकरांनी अनुभवली कडक सुरक्षा यंत्रणा

बीडकरांनी अनुभवली कडक सुरक्षा यंत्रणा


शिरीष शिंदे , बीड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीड येथे सभा होणार असल्याने पोलीस प्रशासन गेल्या चार दिवसांपासून कामाला लागले होते. तसेच स्पेशल प्रोटेक्शन गु्रप मार्फत सभेच्या ठिकाणी कडक सुरक्षा यंत्रणा होती.
सभा परिसरात दाखल होत असलेल्या प्रत्येकाची तपासणी पोलिसांमार्फत करण्यात आली. स्त्रियांचीही महिला पोलिसांमार्फत तपासणी झाली. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अगदी लहान-लहान बाबींची दक्षता घेतली गेली. पाण्याच्या बाटल्या, खिशातील पेन, डायऱ्या, तंबाखुच्या पुड्या सोडूनच प्रवेश देण्यात आला होता. सभेच्या ठिकाणी मोबाईल व बॅग्जला प्रतिबंध घालण्यात आला होता. पंतप्रधान येणार असल्याने सर्वांना सभेच्या ठिकाणचे पास देण्यात आले होते़ विशेष पोलीस महानिरिक्षक अमितेश कुमार, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. काळजी घेत पोलीस यंत्रणेने सभा शांततेत पार पाडली़

Web Title: Beadkar experienced strong security mechanisms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.