बीडच अव्वल

By Admin | Updated: June 14, 2017 00:28 IST2017-06-14T00:27:55+5:302017-06-14T00:28:23+5:30

बीड : शालांत परीक्षेत औरंगाबाद विभागातून बीड जिल्ह्याने ९२.६५ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Bead topper | बीडच अव्वल

बीडच अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शालांत परीक्षेत औरंगाबाद विभागातून बीड जिल्ह्याने ९२.६५ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. बारावीच्या परीक्षेत निकालात मुलींनी बाजी मारली होती; त्याचप्रमाणे शालांत परीक्षेतही निकालात मुलीच सरस ठरल्या.
जिल्ह्यात ४२ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२ हजार ४४३ परीक्षेला बसले. यापैकी विशेष गुणवत्ता यादीत १४ हजार ४५५, प्रथम श्रेणीमध्ये १६ हजार ७७९, द्वितीय श्रेणीत ७ हजार ३५०, तर उत्तीर्ण ७४० असे एकूण ३९ हजार ३२४ विद्यार्थी पास झाले.
तालुकानिहाय निकालात बीड तालुक्याने सर्वाधिक ९४.६६ टक्के निकाल देऊन प्रथम क्रमांक पटकावला. त्याखालोखाल पाटोदा (९४.३२), आष्टी (९४.११), गेवराई (९१.२३), अंबाजोगाई (९०.९९), माजलगाव (८९.२०), केज (९३.१२), परळी (९०.७५), धारूर (९३.८४), शिरूर (९२.९८), तर वडवणी तालुक्याचा ९३.९८ टक्के निकाल लागला.
तालुकानिहाय निकालात पाटोदा व आष्टी तालुक्यांनी मुलींच्या उत्तीर्ण टक्केवारीत ९६.५७ टक्के म्हणजे प्रथम क्रमांक पटकावला. मुलांमध्ये ९२.९७ टक्केवारी घेऊन पाटोदा तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला.

Web Title: Bead topper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.