शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीविषयी सकारात्मक व्हा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:54 IST

विद्यार्थ्यांनी जीएसटीत होणा-या बदलाचे अद्ययावत ज्ञान सतत आत्मसात केले पाहिजे, असे आवाहन सीए. उमेश शर्मा यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वस्तू व सेवा करप्रणाली ही भारताच्या अर्थकारणात क्रांतिकारी पाऊल आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत, पण भविष्य उज्ज्वल आहे. या करप्रणालीकडे सकारात्मकपणे पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीएसटीत होणा-या बदलाचे अद्ययावत ज्ञान सतत आत्मसात केले पाहिजे, असे आवाहन सीए. उमेश शर्मा यांनी केले.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयातर्फे आयोजित ‘जीएसटीचे सामाजिक व आर्थिक परिणाम’ यावरील चर्चासत्रात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त प्रसन्न दातार होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. जे. के. वासडीकर हे होते. यावेळी अ‍ॅड. कल्पलता पाटील भारस्वाडकर, डॉ. सुनंदा चक्रनारायण, डॉ.सुनीता बाजपाई तसेच विधि महाविद्यालयाचे प्राचार्य सी. एम. राव यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध शाखांमधील विषयतज्ज्ञांनी जीएसटीवरील २०० शोधनिबंध सादर केले. या शोधनिबंधांची स्मरणिका यावेळी प्रकाशित करण्यात आली.उमेश शर्मा म्हणाले की, सध्या जे संघटित उद्योग क्षेत्र आहे ते जीएसटीमुळे आनंदीत आहे, पण असंघटित क्षेत्राला करप्रणालीत अडचणी येत आहेत. मुख्यत: जीएसटीएन नेटवर्कमधील तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत, पण भविष्यात या समस्या मिटतील व जीएसटीने देशाचा आर्थिक व्यवस्थेचा विकास होईल हे निश्चित.प्रसन्न दातार यांनी जीएसटी म्हणजे काय, केंद्र व राज्य जीएसटी म्हणजे काय हे सांगितले. जीएसटी ही सर्वोत्तम करप्रणाली असल्याचा उल्लेख त्यांनी केला. अ‍ॅड. वासडीकर म्हणाले की, १ जुलैला जरी जीएसटी लागू झाला, पण अजूनही त्यात सुधारणा करणे सुरू आहे. जीएसटीची तयारी रात्रीतून झाली नाही. मागील १० वर्षे अभ्यास करून करप्रणाली तयार करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी, प्राचार्या व्ही. व्ही. पुरोहित यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन करून प्रा.अनुया चांदोरकर यांनी आभार मानले.