सावधान, मोबाईल ‘व्यसन’ होतेय !

By Admin | Updated: April 19, 2015 00:49 IST2015-04-19T00:38:48+5:302015-04-19T00:49:00+5:30

लातूर : तंत्रज्ञानाचा लातूरकरांच्या जीवनावर किती घट्ट पगडा बसला आहे, याची प्रचिती ‘लोकमत’ चमूने घेतली. मोबाईल ही चांगलीच ‘गरज’ बनली असून तो नसेल

Be careful, mobile is 'addictive'! | सावधान, मोबाईल ‘व्यसन’ होतेय !

सावधान, मोबाईल ‘व्यसन’ होतेय !


लातूर : तंत्रज्ञानाचा लातूरकरांच्या जीवनावर किती घट्ट पगडा बसला आहे, याची प्रचिती ‘लोकमत’ चमूने घेतली. मोबाईल ही चांगलीच ‘गरज’ बनली असून तो नसेल तर आम्ही अस्वस्थ होतो अशी कबुली मोबाईल वापरणाऱ्या लातूरकरांनी दिली. जिल्ह्यात मोबाईल वापरणाऱ्याचा आकडा १८ लाखाच्या घरात गेला आहे. या वाढत्या तंत्रज्ञानामुळे जरी नागरिकांना फायदा झाला असला तरी मोबाईल व्यसन झाल्याने त्याच्या आहारी जाऊन स्वत:चे मानसिक स्वास्थ्यही हरवून बसण्याचा चांगलाच धोका निर्माण झाला आहे. याचा ‘लोकमत’च्या चमूने घेतलेला हा वेध.
लातूर जिल्ह्यात मोबाईल धारकांची संख्या १८ लाखांच्या घरात आहे़ शिक्षणाच्या निमित्ताने परगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांकडे तसेच बहुतांश वापरकर्त्यांकडे दोन-तीन सीमकार्ड आहेत़ जिल्ह्यात ९ नेटवर्कद्वारे मोबाईल सेवा मिळते़ मोबाईलवर बोलण्यासोबतच संदेशांची देवाण-घेवाण, सोशल मीडिया, इंटरनेट, २जी, ३ जी सेवा मोबाईलवर उपलब्ध आहेत़ लवकरच लातूर शहरात ४जी सेवा सुरु होणार आहे़ आजमितीला १८ लाख मोबाईल धारकांपैकी सुमारे ६० टक्के नागरिक सोशल मीडिया व इंटरनेटचा वापर करीत आहे़ यातील बहुतांश नागरीकांना मोबाईलचे व्यसन जडले आहे़ वाहन व मोबाईल जणू ही तरुणाईची जिवनशैलीच बनली आहे़
जिल्हाभरात दररोज ७०० मोबाईलची विक्री होते़ लातूर शहरातील आकडा ४०० च्या घरात आहे़ यात स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या ७० टक्के आहे़ तर ३० टक्के नागरिक मल्टिमीडिया मोबाईलचा वापर करतात़ यामुळे तरुणाईसह महिला व ज्येष्ठ नागरीकांची बोटे स्मार्ट फोनवर फिरकू लागली आहेत़ बार फोन, स्लाईडींग, फ्लिप, जावा, टच फोन आणि नव्या युगातील स्मार्ट फोनमधील अ‍ॅन्ड्रॉइड, विंडोज, आयओएस सिस्टीम मोबाईलधारकात नवचैतन्य आणत आहेत़ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल दिसतोच़
४सोशल मिडियावरील फेसबुकसह व्हॉट्स अ‍ॅप मनोरंजनाचे जणू एक साधनच बनले आहे़ फॅमिली ग्रुप, कार्यालयीन ग्रुप, मैत्री ग्रुप, बिजनेस ग्रुप, विविध संघटनांच्या ग्रुपमधून विचारांची देवाण-घेवान दिवसरात्र चालूच असते़
आपण मोबाईल किती वर्षापासून वापरता ? या प्रश्नाच्या उत्तरात ४८ टक्के लोक पाच वर्षांपासून मोबाईल वापरतात़ २५ टक्के ७ वर्षांपासून, २७ टक्के लोक १० वर्षांपासून मोबाईल वापरतात़ २.आपण मोबाईलचा वापर कशासाठी करता ? असे विचारले असता ६८ टक्के नागरिक फक्त बोलण्यासाठी मोबाईलचा वापर करतात़ ३ टक्के लोक संगीत ऐकण्यसाठी, १४ टक्के लोक सोशल मीडियासाठी तर १५ टक्के लोक व्यवसायाला उपयुक्त वापर करतात़ ३़आपला मोबाईल दिवसातून किती तास बंद असतो ? या प्रश्नावर २७ टक्के लोक १ तास, ३३ टक्के २ तास, ३० टक्के ४ तास मोबाईल बंद ठेवतात़ १० टक्के लोक मोबाईल चालूच ठेवतात़ ४़मोबाईल शिवाय दिवस जाईल का? ६६ टक्के नाही म्हणाले़ ३४ टक्के होय म्हणाले़ ५़मोबाईलमुळे कौटुंबीक, सामाजिक संवाद कमी झाला आहे असे वाटते का ? होय ५६ टक्के, नाही ४४ टक्के ६़मोबाईलचा जास्त फायदा कशासाठी होतो ? २२ टक्के व्यवसायासाठी, ३१ टक्के कार्यालयीन कामकाजासाठी, २५ टक्के नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी, २२ टक्के मित्रांशी गप्पा मारण्यासाठी केला जातो़
दिवसातून एक तास मोबाईलसाठी आॅफ तास ठरवून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
४शक्य असल्यास सुटीच्या दिवशी मोबाईल बंद ठेवून नैसर्गिक जगण्याचा आनंद घेण्यासाठी ‘डे विदाऊट मोबाईल’ ची कृती करावी.
४आपण आपल्या मोबाईल वापराचे ‘सेल्फ आॅडीट’ करावे. बोलण्यासाठी किती वापरला जातो, व्हाट्स् अ‍ॅपसाठी किती ? फेसबूकसाठी किती ? मनोजरंनासाठी किती ? व्यवसायासाठी किती ? याचा वापर होतो याचा हिशेब करुन काही गरजा कमी करता येतील काय ते पहावे.
४वाहन चालविताना हेडफोन वापरू नये़ हेडफोन वापरताना बाह्य कानाला इजा होईल, असा वापर करू नये़
स्मार्ट फोनच्या वापरासाहेबतच हेडफोन वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे़ हेडफोन सतत वापरला तर बाह्य कानाला इजा होऊ शकते,कालांतराने ऐकायला कमी येऊ शकते, वाहन चालविताना हेडफोन वापरल्याने अपघात होत असल्याचे कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ़ गिरीष ठाकूर यांनी सांगितले़
४सोशल मेडिया, व्हॉटस अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इंटरनेटचा वापर तरूणाई अधिक करीत आहेत़ इंटरनेट अ‍ॅडिक्शन हे अमेरिकन सायकॅट्रिक्स सोसायटीने मानसिक आजार असल्याचे स्पष्ट केले आहे़ मोबाईल वापरामुळे स्वत:भोवती अभासी जग तयार होत आहे़ मनोविकार तज्ञ डॉ़ प्रदीप बोडके यांनी सांगितले़
हातात सतत मोबाईल असणे. तो नसल्यास बेचैन वाटणे़
४फोन आल्यास बोलणे, न आल्यास गेम अथवा चॅटींगसाठी कायम वापरणे.
४रात्री झोपताना मोबाईल पाहिल्याशिवाय न झोपणे आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हाती घेऊन पाहणे.
४मोबाईलची रिंग वाजल्या-वाजल्या हातातील सगळी कामे बाजूला करुन तो घेण्याची गडबड करणे.
४वेळ, चॅटींग, फेसबुक, व्हाटस् अ‍ॅप, टिष्ट्वटर इतकेच काय तर गणितीय आकडेमोड, स्मरणासाठी अलार्म, कॅलेंडर या साऱ्यांसाठी मोबाईलवरच विसंबून राहणे.
४ भोजन करताना, वाहन चालविताना, अगदी टॉयलेटमध्ये बसल्यावरही मोबाईलवर बोलणे किंवा चॅटींग करण्याला प्राधान्य देणे.



४ कार्यक्रमाला उपस्थिती राखल्यानंतर समुहात बसल्यावर इतरांच्या चर्चेऐवजी आपण आपल्या मोबाईलमध्ये डोके खुपसून बसणे.

Web Title: Be careful, mobile is 'addictive'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.