शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

सावधान ! पाचशे, शंभराच्या बनावट नोटा पुन्हा चलनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 20:04 IST

व्यवहारात प्रत्येक नोट तपासून घ्या, नसता आर्थिक भुर्दंड बसू शकतो. 

ठळक मुद्देबंडलमध्ये निघतात रंगीत झेरॉक्स नोटा स्वीकारताना करा खात्री

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत पाचशे व शंभर रुपयांच्या बनावट नोटा पुन्हा चलनात आल्याचे निदर्शनात आले आहे. काही व्यापाऱ्यांकडे आलेल्या नोटांच्या बंडलामध्ये या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. यामुळे सावधान, व्यवहारात प्रत्येक नोट तपासून घ्या, नसता आर्थिक भुर्दंड बसू शकतो. 

औरंगपुऱ्यातील एका किरकोळ व्यापाऱ्याला नोटांच्या बंडलात १०० रुपयांच्या दोन बनावट नोटा आढळून आल्या. तसेच मोंढ्यातील एका व्यापाऱ्याकडेही ग्राहकाने बंडलमध्ये एक ५०० रुपयांची बनावट नोट दिली. रात्री हिशोब करताना त्या व्यापाऱ्याला ही नोट आढळून आली. एवढेच नव्हे तर एका होलसेलरला   बंडलात ५०० रुपये व २ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या व्यापाऱ्यांनीही माहिती अन्य व्यापाऱ्यांना दिल्याने हे लक्षात आले. या नोटांकडे बघितले असता ओरिजनल नोटांचे रंगीत झेरॉक्स काढल्याचे लगेच लक्षात घेते. बँकेत गेल्यावर या बनावट नोटा नष्ट केल्या जातील, आर्थिक नुकसान होईल, पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागेल. हे टाळण्यासाठी मग काही जण बनावट नोटा फाडून नष्ट करीत आहेत किंवा काही जण नोटांच्या बंडलात टाकून दुसऱ्यांना देत आहेत. मात्र, अशा नोटा बँकेत जाणार नाहीत याची खबरदारीही घेतली जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

अनेक व्यापारी सध्या ५०० व २ हजार रुपयांच्या नोटा तपासूनच घेत आहेत. आता १०० रुपयांच्या बनावट नोटा येत असल्याने त्याही तपासून घेऊ लागले आहेत. बाजारपेठेत बनावट नोटा थोड्याफार प्रमाणात आढळून येऊ लागल्यामुळे सध्या व्यापारी वर्गात बनावट नोटांबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. अशा किती बनावट नोटा शहरातील अर्थव्यवस्थेत आहेत, याचा अंदाज लावणे कठीण आहे. या बनावट नोटांबद्दल पोलिसांत कोणी माहिती देत नसल्याने बनावट नोटा तयार करणाऱ्या गुन्हेगारांचे फावत आहे.

बनावट नोटांसह आरोपी पकडल्याच्या शहरातील काही घटना २८ फेब्रुवारी २०१८ रोजी, सिडकोतील कॅनॉट प्लेस परिसरात फिरणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून दीड लाखाच्या ३०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. २० डिसेंबर २०१७ तेलंगणातून बनावट नोटा घेऊन शहरात आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती.४२३ जुलै २०१७ ला शहरात दोन हजारांच्या बनावट नोटा चालवणारे रॅकेट उघडकीस आले होते. २७ मे २०१७ रोजी पोलिसांनी सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या व प्रिंटरसह दोघांना अटक केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसाAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस