शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

'बाटू' विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळेंचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच तडकाफडकी राजीनामा

By राम शिनगारे | Updated: March 25, 2026 14:55 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात पुन्हा प्रशासकीय भूकंप, तिसऱ्या कुलगुरूंचा पदत्याग

छत्रपती संभाजीनगर : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी पदाचा राजीनामा कुलपती तथा राज्यपालांकडे सुपूर्द केल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. त्यास तंत्र शिक्षणातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील संशोधक डॉ. कारभारी काळे यांची ३१ डिसेंबर २०२१ रोजी ‘बाटू’च्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली होती. त्यांना पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ मिळणार होता. मात्र, हा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच डॉ. काळे यांनी राजीनामा दिला आहे. कुलपती डॉ. काळे यांचा राजीनामा स्वीकारतात की नाही याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे. डॉ. काळे यांच्या राजीनाम्याचे कारण समजू शकले नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

गैरव्यवस्थापनामुळे विद्यापीठ चर्चेत‘बाटू’ विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील परीक्षांच्या निकालांसह इतर गैरव्यवस्थापनामुळे विद्यापीठ चर्चेत आलेले आहे. अनेक महाविद्यालयांनी पुन्हा जुन्या विद्यापीठाचे संलग्नता घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कायद्यात बदल करण्याची मागणीही राज्य शासनाकडे वारंवार होत आहे. त्यातच विद्यापीठ चालविण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळच उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनाचा संपूर्ण खोळंबा झालेला असल्याचेही विविध चौकशांमधून स्पष्ट झाले. त्यामुळे डॉ. काळे यांचाही राजीनामा राज्य शासनाच्या असहकार्याच्या भूमिकेमुळेच झाला आहे का, अशी चर्चा आहे.

तिसऱ्या कुलगुरूंचा राजीनामा‘बाटू’ विद्यापीठात पायाभूत सुविधांसह मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यातच राज्य शासनाचेही दुर्लक्ष असल्यामुळे विविध कुलगुरूंना कामकाज करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ‘बाटू’चे तत्कालीन कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये राजीनामा दिला होता. मात्र, तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांचा राजीनामा कुलपतींनी फेटाळला होता. त्यानंतर नियुक्त कुलगुरू डॉ. व्ही. आर. शास्त्री यांनीही फेब्रुवारी २०२१ मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर त्या ठिकाणी प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती केली. त्यानंतर ३१ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. काळे यांची नियुक्ती झाली होती. त्यांनीही मुदतपूर्व राजीनामा दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : 'BATU' Vice-Chancellor Karbhari Kale Resigns Before Term Completion

Web Summary : Dr. Karbhari Kale, Vice-Chancellor of BATU, abruptly resigned before completing his term. Internal issues and lack of state government support, similar to past resignations, are speculated reasons. This marks the third VC resignation at the university.
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर