कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारला काही अप्रिय निर्णय घ्यावे लागले- सत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST2021-06-28T04:04:21+5:302021-06-28T04:04:21+5:30
पैठण : कोरोनाची लढाई लढत असताना लोकांच्या जीवाला महत्त्व दिले जात आहे. यामुळे राज्य सरकारला लॉकडाऊन सारखे काही अप्रिय ...

कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारला काही अप्रिय निर्णय घ्यावे लागले- सत्तार
पैठण : कोरोनाची लढाई लढत असताना लोकांच्या जीवाला महत्त्व दिले जात आहे. यामुळे राज्य सरकारला लॉकडाऊन सारखे काही अप्रिय निर्णयही घ्यावे लागल्याचा खुलासा ग्राम विकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पैठण येथे रविवारी केला.
पैठण पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण मंत्री अब्दुल सत्तार व रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अब्दुल सत्तार बोलत होते. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्ता आल्यापासून कोरोनाशी संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत जनता व गावांच्या सुरक्षेला सरकारने प्राधान्य दिले आहे.
रोहयोच्या जाचक अटी रद्द केल्याने योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे. राज्यभर रोहयोंतर्गत विविध कामांतून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत असल्याचे समाधान असल्याचे प्रतिपादन रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी यावेळी बोलताना केले. वाॅटर ग्रीड योजनेतून पैठण तालुक्यातील प्रत्येक घराला नळ व पाणी देण्यात येईल, असे आश्वासन याप्रसंगी बोलताना मंत्री भुमरे यांनी दिले. यावेळी बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, विलास भुमरे, शिवराज भुमरे, पं.स. सभापती अशोक भवर, उपसभापती कृष्णा भुमरे, गटनेता तुषार पाटील, ज्ञानेश्वर कापसे, साईनाथ सोलाट, नंदलाल काळे, जितसिंग करकोटक, विनोद बोंबले, अण्णासाहेब लबडे, सोमनाथ परदेशी, अरूण काळे, मनोज पेरे, जालिंदर आडसुळ, ज्योती काकडे, संतोष सव्वाशे, दीपक मोरे, सुनील हिंगे, संजय कस्तुरे, शाम जगताप, गटविकास अधिकारी काळूराम बागूल, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.