प्लॅटफॉर्मवर आंघोळ करणे, कपडे धुणे पडले महागात

By Admin | Updated: June 26, 2017 00:52 IST2017-06-26T00:49:36+5:302017-06-26T00:52:20+5:30

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर शनिवारी (दि. २४) आंघोळ करणे आणि कपडे धुणे १२ प्रवाशांना चांगलेच महागात पडले

Bathing on the platforms, washing clothes costume | प्लॅटफॉर्मवर आंघोळ करणे, कपडे धुणे पडले महागात

प्लॅटफॉर्मवर आंघोळ करणे, कपडे धुणे पडले महागात

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर शनिवारी (दि. २४) आंघोळ करणे आणि कपडे धुणे १२ प्रवाशांना चांगलेच महागात पडले. रेल्वेस्टेशनवर अस्वच्छता केल्याप्रकरणी या सर्व प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने प्रत्येकी ३०० प्रमाणे ३६०० रुपयांचा दंड वसूल केला.
देवदर्शनासाठी रेल्वेच्या विशेष बोगीने शनिवारी दुपारी काही प्रवासी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर उतरले होते. ही बोगी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर थांबविण्यात आली होती. प्रवाशांच्या सुविधेसाठी या प्लॅटफॉर्मवर पाण्याची टाकी आणि नळ आहे. प्रवासातून आल्यामुळे बोगीतील काहींनी थेट प्लॅटफॉर्मवरच आंघोळ केली. काही जणांनी प्लॅटफॉर्मवरच कपडे धुण्यास सुरुवात केली.
हा प्रकार स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, आरोग्य निरीक्षक आशुतोष गुप्ता आणि अन्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ प्लॅटफॉर्मवर धाव घेऊन रेल्वेस्टेशनवर अशा प्रकारे अस्वच्छता केल्याप्रकरणी त्यांनी प्रवाशांना चांगलेच सुनावले. काही प्रवाशांनी त्यांच्याशी वादही घातला. परंतु कोणत्याही दबावाला न जुमानता रेल्वेस्टेशनवर आंघोळ आणि कपडे धुवून अस्वच्छता केल्यामुळे १२ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली.

Web Title: Bathing on the platforms, washing clothes costume