शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

डागी नोटा जमा करून घेण्यास बँकांचा नकार ; रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला हरताळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 5:50 PM

डाग लागलेल्या किंवा पेनाने आकडे लिहिलेल्या ५००, २ हजार रुपयांचा नोटा खातेदारांकडून  बँकेने स्वीकाराव्यात, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत; मात्र शहरातील अनेक बँका या आदेशाला मानत नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.

औरंगाबाद : डाग लागलेल्या किंवा पेनाने आकडे लिहिलेल्या ५००, २ हजार रुपयांचा नोटा खातेदारांकडून  बँकेने स्वीकाराव्यात, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत; मात्र शहरातील अनेक बँका या आदेशाला मानत नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.  कोणी डागी नोटा बँकेत आणल्या, तर कॅशिअर सरळ हात वर करीत आहेत. यामुळे या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. 

५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांवर लिहिले तर अशा नोटा बँका घेणार नाहीत, अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यासंदर्भात आरबीआय (रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया) ने स्पष्ट केले आहे की, या नवीन नोटांवर काहीही लिहिले असले किंवा नोटांचा रंगही गेला असला, डाग लागलेला असला तरी बँका या नोटा नाकारू शकत नाहीत.

एवढे स्पष्ट आदेश असतानाही शहरातील बँका अशा नोटा स्वीकारत नसल्याच्या तक्रारी ‘लोकमत’कडे आल्या होत्या. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने विविध भागांतील काही राष्ट्रीयीकृत, खाजगी व नागरी सहकारी बँकांमध्ये चौकशी केली असता लोकांच्या तक्रारी तंतोतंत खºया असल्याचे आढळून आले. पैठणगेट ते निराला बाजारकडे जाणा-या मधल्या रस्त्यावर युनियन बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेतील कॅशिअरला आमच्या प्रतिनिधीने सांगितले की, माझ्याकडे २ हजार रुपयांच्या तीन नोटा आहेत, त्यास पेनाच्या शाईचे डाग पडले आहेत, त्या नोटा तुम्ही घ्याल का, यावर कॅशिअरने सरळ ‘नकार’ दिला. आम्ही अशा नोटा स्वीकारत नाही, असे त्याने सांगितले. मिलकॉर्नर येथील एसबीआय शाखेतील कॅशिअरला हाच प्रश्न विचारला, तेव्हा तिथे कॅशिअर असलेल्या तरुणीने सांगितले की, तुम्ही मला नोटा आणून दाखवा मी आमच्या शहागंज शाखेतील बँकेत चौकशी करते, तेथील अधिका-यांनी होकार दिला, तर तुमची नोट स्वीकारते.

यानंतर रेल्वेस्टेशन रोडवरील ओमप्रकाश देवडा पीपल्स को-आॅपरेटिव्ह बँक (हिंगोली) येथील कॅशिअरने  ‘कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम) मध्ये डागी नोट जमा करा, असा सल्ला दिला. अदालत रोडवरील पंजाब नॅशनल बँकेतील कॅशिअरने तर नोट स्वीकारण्यास नकार दिला व अमरप्रीत चौकातील एसबीआयच्या करन्सी चेस्टमध्ये नोटा जमा करण्याचे सांगितले. 

याच अदालत रोडवरील आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस बँक व समर्थनगर रोडवरील आयडीबीआय बँकेच्या कॅशिअरने ‘नोटा दाखवा, किती खराब आहेत ते पाहून आम्ही निर्णय घेऊ, असे सांगून सावध पवित्रा घेतला. एकंदरीत बँका ५०० व २ हजार रुपयांचा डागी नोटा किंवा पेनाने लिहिलेल्या नोटा जमा करून घेण्यास ‘टाळाटाळ’ करीत असल्याचे निदर्शनास आले. खराब झालेल्या, डागी नोटा, फाटलेल्या नोटा अनेक जणांकडे आहेत.  दुकानदार या नोटा स्वीकारत नाहीत व बँका या नोटा खात्यात जमा करून घेत नाहीत, यामुळे या ‘नोटांचे’ करायचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

दरमहिन्याला जमा होतात २ लाखांच्या खराब नोटा अमरप्रीत चौकातील व शहागंज येथील एसबीआयच्या करन्सी चेस्टमध्ये यासंदर्भात चौकशी केली असता तेथील रोकड व्यवस्थापकाने सांगितले की, दोन्ही बँकांत दर महिन्याला प्रत्येकी १ लाख रुपयांच्या खराब नोटा जमा होत आहेत. यात ५०० व २ हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. यात शाईचे डाग लागलेल्या, पेनाने आकडे लिहिलेल्या, धुण्यात खराब झालेल्या, फाटलेल्या, एवढेच नव्हे, तर उंदरांनी कुरतडलेल्या नोटाही येतात, असेही नमूद केले. 

बँकेच्या मॅनेजरने दिला अजब सल्ला युनियन बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेतील व्यवस्थापकांना आमचा प्रतिनिधी जाऊन भेटला, तेव्हा त्या व्यवस्थापकाने अशा शाईचा डाग असलेल्या नोटा बँकेत कशाला आणता, एक काम करा, तुम्ही पेट्रोलपंपावर या नोटा चालवा, मी सुद्धा माझ्याकडे अशीच सही केलेली नोट आली होती, मी पेट्रोलपंपावर चालविली, असा अजब सल्ला दिला. बँकेचे व्यवस्थापकच असे म्हणत असतील तर ‘आनंदी आनंदच’. 

खराब नोटा स्वीकारण्याची प्रत्येक बँकेवर जबाबदारी एसबीआयच्या करन्सी चेस्ट येथील रोकड व्यवस्थापकाने सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार खराब नोटा स्वीकारण्याची प्रत्येक बँकेवर जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या खातेदारांच्या खात्यात त्या नोटा जमा कराव्यात; पण पुन्हा चलनात आणू नयेत, मात्र बँका हात वर करतात व एसबीआयच्या करन्सी चेस्टकडे ग्राहकांना पाठवितात, हे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :MONEYपैसाbankबँक