रबी पीक कर्जाच्या उद्दिष्टाला बँकाचा ‘खो’

By Admin | Updated: December 28, 2014 01:14 IST2014-12-28T01:11:57+5:302014-12-28T01:14:44+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना रबी पीक कर्ज वाटपासाठी ३२४ कोटी ३५ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर २५ कोटी ३९ लाख रुपयांचे वाटप केले असून,

Bank's 'lost' to Rabi crop loan target | रबी पीक कर्जाच्या उद्दिष्टाला बँकाचा ‘खो’

रबी पीक कर्जाच्या उद्दिष्टाला बँकाचा ‘खो’


उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना रबी पीक कर्ज वाटपासाठी ३२४ कोटी ३५ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर २५ कोटी ३९ लाख रुपयांचे वाटप केले असून, २९८ कोटी रूपयांचे वाटप करणे अद्याप बाकी आहे.
मागील तीन वर्षापूर्वीच्या पीक कर्ज वितरणावर नजर टाकली असता, बँकांनी सढळ हाताने कर्ज दिल्याचे दिसते. यंदा मात्र बहुतांश बँकांनी हात आखडता घेतला आहे. खरिपापेक्षा रबीचे चित्र अधिक चिंताजनक आहे. खत, बी-बियाण्याचे दर वर्षागणिक वाढत आहेत. दरम्यान, पेरणीवेळी शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ येवू नये, म्हणूच शासनाकडून अत्यल्प दरामध्ये पीक कर्ज देण्यात येत आहे. सुरूवातीचे काही वर्ष पीक कर्ज वाटपाचा आकडा मोठा असायचा. यंदाच्या खरीप पेरणीवेळीही मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वाटप करण्यात आले. कर्ज परतफेड करणाऱ्यांचीही संख्याही चांगली आहे. असे असतानाही जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांनी यंदा शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना हात आखडता घेतल्याचे दिसते. (प्रतिनिधी)४
रबी हंगामाचे सरासरी पेरणीचे क्षेत्र ४ लाख ५४ हजार ४१० हेक्टर क्षेत्र आहे. शासनाने जिल्ह्यातील बँकांना रबी हंगामासाठी ३२४ कोटी ३५ लाख रूपये इतके कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. असे असतानाही बँकांनी आखडता हात घेत जिल्ह्यातील अवघ्या २ हजार १३९ शेतकऱ्यांना केवळ २५ कोटी ३९ लाख रुपयांचे रबी पीक कर्ज वाटप केल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Bank's 'lost' to Rabi crop loan target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.