शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेबाबत बँका ‘फेल’!

By admin | Updated: July 30, 2015 00:14 IST

सोमनाथ खताळ , बीड भर दिवसा बँकेतील चोरीची घटना ताजी आहे. या पार्श्वभूमीवर इतर बँकानी सुरक्षेची नेमकी काय व्यवस्था केली आहे, याची पाहणी

सोमनाथ खताळ , बीड भर दिवसा बँकेतील चोरीची घटना ताजी आहे. या पार्श्वभूमीवर इतर बँकानी सुरक्षेची नेमकी काय व्यवस्था केली आहे, याची पाहणी केल्यानंतर बँका अजूनही गाफीलच आहे. शहरातील अनेक बँकामध्ये सुरक्षा रक्षक नाहीत तर काही बँकामध्ये कॅश विभाग वाऱ्यावर सोडून शाखा व्यवस्थापकांशी गप्पा मारायला कॅशियर येतात. एकंदरीत बँक प्रशासन सुरक्षिततेबाबत ‘फेल’ ठरल्याचे बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टींग’मधून समोर आले. यामुळे दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या पैशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी बँकेत भरणा करण्यासाठी मोठी रक्कम घेऊन येणाऱ्या ग्राहकांचाही गाफीलपणाच दिसून आला. शहरातील वर्दळीच्या असणाऱ्या ‘आयसीआयसीआय’ बँकेत मंगळवारी भर दिवसा १६ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. यामुळे पोलीस प्रशासनासह संपुर्ण जिल्हा हादरून गेला होता. हाच धागा पकडून बुधवारी बँक सुरक्षिततेबाबत किती जागरूक आहेत? याचे ‘लोकमत’ ने ‘स्टींग’ केले. परंतु या पाहणीत बँका सुरक्षेसंदर्भात सपशेल ‘फेल’ ठरल्या. मोंढा रोडवर असणाऱ्या या बँकेत सुरक्षा रक्षकच नव्हता. कॅश विभागाच्या बाजुलाच खाजगी व्यक्तीने एन्ट्री केली होती. तसेच कॅश विभागाचा दरवाजा उघडा होता. पाच मिनिटानंतर कॅशिअर शाखा व्यवस्थापकांना माहिती विचारण्यासाठी कॅश विभाग वाऱ्यावर सोडून आले. याठिकाणी मोठी गर्दी होती. ४ सीसीटीव्ही कॅमेरे होते. आणखी चार कॅमेऱ्याची मागणी केल्याचे शाखा व्यवस्थापक पारस राव यांनी सांगितले. या बँकेत शाखा व्यवस्थापक नव्हते. कॅश भरण्यासाठी रांगेत थांबलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या हातात पैसे होते, परंतु ते बिनधास्त होते. पैसे झाकून ठेवलेले नव्हते. तसेच बाकड्यावर एक व्यक्ती तर पैशाने भरलेली बॅग बाजुला ठेवून इकडे तिकडे पहात होता. यामुळे कुठलाही गैरप्रकार घडू शकतो. याठिकाणी नागरिकच गाफिल असल्याचे दिसले. या ठिकाणी सुरक्षारक्षक तर नव्हताच शिवाय सात पैकी केवळ पाचच कॅमेरे सुरू होते. एका कॅमेऱ्याचा व्हीडीओ काळा दिसत होता. शाखा व्यवस्थापकांना विचारले असता, त्यांना सुरक्षेचे कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसून आले. शाखा व्यवस्थापक म्हणून सुशिलकुमार सिंग हे आहेत. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चांगली होती. सुरक्षा रक्षकासह सीसीटीव्ही कॅमेरे होते. कॅश विभागात एक गुप्त कॅमेरा असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेहमीच असल्याचे सचिन रणशिंग यांनी सांगितले. एचडी कॅमेरे होते. याठिकाणी सर्व कर्मचारी अलर्ट होते. बँकेत एन्ट्री करताच सर्वांनी हटकले. दोन कॅशविभाग होते. कॅमेरेही होते. बँकेतील एखाद्या सीस्टीमला छेडण्याचा प्रयत्न केल्यास सर्व कर्मचाऱ्यांना व्हॉईस कॉल जाणार अशी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच कोणालाही न समजेल अशा ठिकाणी सायरण चे बटन होते. याचा आवाज तब्बल पाच किमी पर्यंत जात असल्याचे शाखा व्यवस्थापक विक्रम थोरात यांनी सांगितले. रात्री गस्त घालणाऱ्या पोलीसांची नोंद करणारी डायरीही दरवाजात लटकलेली होती.