बँक रक्कम लुटणारी टोळी जेरबंद

By Admin | Updated: February 12, 2015 00:55 IST2015-02-12T00:47:51+5:302015-02-12T00:55:15+5:30

जालना: घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जालना येथील बँकेची रोकड लुटणारी टोळी पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतली. बँक रक्कम लूट केल्याने मोठी खळबळ उडाली होती.

Bank robbery band robbery | बँक रक्कम लुटणारी टोळी जेरबंद

बँक रक्कम लुटणारी टोळी जेरबंद


जालना: घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जालना येथील बँकेची रोकड लुटणारी टोळी पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतली. बँक रक्कम लूट केल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांसमारेही मोठे आव्हान होते. अखेर बुलडाणा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीवरुन सर्व लुटारु पोलिसांच्या जाळ्यात आले.
बुलडाणा पोलिसांनी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून पकडण्यात आलेला आरोपी जालना जिल्ह्यातील असून अधिक तपशील मागितला. माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापे मारुन आरोपीची नावे व पत्ते मिळविले. यात मुख्यसूत्रधार शिवाजी सटवाजी भागडे रा. सावरगाव, आकाश थेटे, मदन भागडे, लहू जाधव, ज्ञानेश्वर खरात, गोविंद डोंगरे या आरोपींची माहिती मिळवून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल, बँकेच्या लुटलेल्या रकमेतून घेतलेली स्कॉर्पिओ गाडी, एक आयशर, एक प्लॉट व नगरी ९० हजार व असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह व अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर व प्रियंका नरनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कुलकर्णी यांच्या पथकामार्फत करण्यात आली.
दरम्यान, या टोळीकडून इतर गुन्हेही उघडीस येतील असा अंदाज पोलिस सूत्रांनी व्यक्त केला. (वार्ताहर)
तीर्थपुरी येथे चिखली बँकेची रक्कम वाहतूक करणारे वाहन दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात इसमांनी १ सप्टेंबर २०१४ रोज अडविले. बँकेची २० लाखांची रक्कम जबरदस्ती काढून फरार झाले. तर दुसऱ्या घटनेत १८ आॅक्टोबर २०१४ रोजी नवा मोंढा येथील बँकेची रक्कम घेवून जात असलेल्या रिक्षा अडवून ३० लाखांची रक्कम लुटण्यात आली होती. गोंदी येथे ही बँक लुटण्याचा प्रयत्न ६ डिसेंबर २०१४ रोजी झाला होता. २६ डिसेंबर २०१४ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे एसबीआय बँकेची रक्कमही लुटण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, यातील एका आरोपीस नागरिकांनी मोठ्या धाडसाने पकडले.

Web Title: Bank robbery band robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.