जप्ती केल्याने बँक अधिकार्यांस धमकी
By Admin | Updated: May 10, 2014 23:49 IST2014-05-10T23:44:04+5:302014-05-10T23:49:23+5:30
जालना : जप्ती केल्यानंतर थकबाकीदार कर्जदाराने आपणास धमकी दिल्याची तक्रार बँक आॅफ इंडियाचे जालना शाखेचे मुख्य प्रबंधक कैलास बोरावके यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिली आहे.

जप्ती केल्याने बँक अधिकार्यांस धमकी
जालना : कर्ज रक्कमेची परतफेड न केल्याने मिळकतीवर जप्ती केल्यानंतर थकबाकीदार कर्जदाराने आपणास धमकी दिल्याची तक्रार बँक आॅफ इंडियाचे जालना शाखेचे मुख्य प्रबंधक कैलास बोरावके यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिली आहे. ७ मे रोजी दिलेल्या या तक्रारीत बोरावके यांनी म्हटले आहे की, वैजनाथ सखाराम ढोरकुले (रा. हिवरा राळा, ता. बदनापूर, ह.मु. राजूर) यांनी २४ जुलै २००९ रोजी पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत वीटभट्टी व्यवसायासाठी ६ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले. परंतु त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्यासाठी बँकेने नियमानुसार त्यांच्याकडे पाठपुरावाही केला; परंतु तरीही कर्ज परतफेड न झाल्याने त्यांच्याविरुद्ध सरफेसी कायद्यानुसार मी आणि बँकेचे वसुली प्रतिनिधी अमित पवार यांनी ढोरकुले यांची राजूर येथील त्यांनी बँकेस तारण गहाण दिलेली मिळकत ६ मे २०१४ रोजी ताबा घेऊन जप्त केली. याच कारणावरून ढोरकुले व त्यांचे सहकारी गजानन बंगाळे यांनी भ्रमणध्वनीवरून सदर वसुली कारवाई का केली, असे विचारून धमकी दिली, असेही तक्रारीत नमूद केले आहे. ढोरकुले व त्यांच्या सहकार्यापासून आपल्या जीवितास धोका असल्याचेही बोरावके यांनी या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात वैजनाथ ढोरकुले व गजानन बंगाळे या दोघांविरुद्ध अदलखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.