बँक अधिकाऱ्याला मारहाण

By Admin | Updated: July 15, 2017 00:17 IST2017-07-15T00:15:10+5:302017-07-15T00:17:17+5:30

परभणी : येथील मोंढा भागातील युको बँकेतील अधिकाऱ्याला पीक विम्याच्या रक्कमेवरुन काही शेतकऱ्यांनी गुरुवारी मारहाण केल्याने बँकेतील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी बँकेला कुलूप लावून आतमध्ये कामकाज केले.

Bank officials beat up | बँक अधिकाऱ्याला मारहाण

बँक अधिकाऱ्याला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील मोंढा भागातील युको बँकेतील अधिकाऱ्याला पीक विम्याच्या रक्कमेवरुन काही शेतकऱ्यांनी गुरुवारी मारहाण केल्याने बँकेतील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी बँकेला कुलूप लावून आतमध्ये कामकाज केले.
परभणीतील मोंढा भागातील युको बँकेत काही शेतकरी गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पीक विम्याच्या रक्कमेसाठी गेले होते. परंतु, बँकेच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने बँक अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये वादावादी झाली. या वादावादीतून काही शेतकऱ्यांकडून बँकेच्या अधिकाऱ्याला मारहाण झाली. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शाखा व्यवस्थापकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बँकेचे शटर लावून कामकाज केले. दरम्यान, युको बँकेचे शाखा व्यवस्थापक संतोष पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता, मारहाण झाली आहे; परंतु, वरिष्ठांचा आदेश प्राप्त न झाल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. शनिवारपासून बँकेचे काम सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Bank officials beat up