बँक कर्मचाऱ्यांची ‘लिव्ह सॅलरी’ मिळेना
By Admin | Updated: June 15, 2014 00:58 IST2014-06-15T00:24:11+5:302014-06-15T00:58:12+5:30
उस्मानाबाद : कृषी बँक कर्मचाऱ्यांना एप्रिल अखेर मिळणारी लिव्ह सॅलरी अद्याप मिळाली नसल्याचे निवेदन कृषी बँक कर्मचारी संघटनेने शनिवारी जिल्हा बँकेच्या प्रशासनाला दिले आहे.

बँक कर्मचाऱ्यांची ‘लिव्ह सॅलरी’ मिळेना
उस्मानाबाद : कृषी बँक कर्मचाऱ्यांना एप्रिल अखेर मिळणारी लिव्ह सॅलरी (हक्काच्या रजेचा पगार) अद्याप मिळाली नसून, मागील दोन वर्षांपासूनची वेतनवाढही रखडली असल्याचे निवेदन कृषी बँक कर्मचारी संघटनेने शनिवारी जिल्हा बँकेच्या प्रशासनाला दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम १९४६ चे कलम ३५ (२) अन्वये कामगार उपायुक्त औरंगाबाद यांनी उस्मानाबाद जिल्हा बँकेतील कर्मचारी हे ९ एप्रिल १९९१ रोजीच्या तडजोडीच्या स्थायी आदेशान्वये लिव्ह सॅलरी मिळणेस पात्र राहतील, असे कळविले आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना एप्रिल महिनाअखेर ही सॅलरी दिले जाते. मात्र, सन २०१३-१४ या वर्षाची लिव्ह सॅलरी अद्यापही मिळालेली नाही. याबाबत चेअरमन व प्रभारी कार्यकारी संचालक यांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून विनंती केली. मात्र, अद्यापही ही पगार मिळालेली नाही.
याशिवाय सन २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षाची वार्षिक वेतनवाढही कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे १६ जूनपर्यंत याबाबत निर्णय नाही झाल्यास आंदोलन उभारण्याचा निर्णय संघटनेने ८ जून रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)