बंजारा समाजाचा परभणीत मोर्चा

By Admin | Updated: August 20, 2014 23:55 IST2014-08-20T23:43:13+5:302014-08-20T23:55:23+5:30

परभणी : बंजारा समाजातील नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २० आॅगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयावर मोर्चा काढत शक्तीप्रदर्शन केले.

Banjara Samaj's Parbhanchat Morcha | बंजारा समाजाचा परभणीत मोर्चा

बंजारा समाजाचा परभणीत मोर्चा

परभणी : बंजारा समाजातील नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २० आॅगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयावर मोर्चा काढत शक्तीप्रदर्शन केले.
गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, क्रिमिलेअर सारखी जाचक अट रद्द करावी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण, शिवचरण महाराज व गोर सेनेचे अध्यक्ष निलाकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. वसंतराव नाईक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावर मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी अरुण चव्हाण यांनी बंजारा समाजाच्या समस्या मांडल्या. मागण्या न मान्य झाल्यास २२ आॅगस्ट रोजी महाराष्ट्रभर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी विलास राठोड, ज्ञानेश्वर राठोड, देविदास राठोड, अ‍ॅड. विनोद राठोड, धोंडीराम आडे, अंकुुश पवार, नवनाथ राठोड, आकाश राठोड, प्रल्हाद चव्हाण, राजेश राठोड, विजय चव्हाण, नितीन राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Banjara Samaj's Parbhanchat Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.