बंजारा समाजही आरक्षण आंदोलनात

By Admin | Updated: August 7, 2014 23:29 IST2014-08-07T23:06:34+5:302014-08-07T23:29:39+5:30

हिंगोली : आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांच्या लढाईत बंजारा समाजानेही उडी घेत आज शहरातून मोठा मोर्चा काढला.

Banjara community also organized the reservation movement | बंजारा समाजही आरक्षण आंदोलनात

बंजारा समाजही आरक्षण आंदोलनात

हिंगोली : आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांच्या लढाईत बंजारा समाजानेही उडी घेत आज शहरातून मोठा मोर्चा काढला.अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करीत गोर सेना जिल्हा शाखेकडून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
जि. प. मैदानावरून काढण्यात आलेल्या या मोर्चात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात पोस्ट आॅफिस रोड, गांधी रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला. विविध घोषणांचे फलक व पांढऱ्या रंगाचे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनेक महिला बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेसह या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजातील मान्यवरांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. बंजारा समाजाला देशभर अनुसूचित जमातीत सहभागी करण्याचा संसदेत धूळ खात पडलेला प्रस्ताव मंजूर करावा, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात बंजारा समाजाला टाकल्यामुळे बदललेला प्रवर्ग दुरुस्त करावा, महाराष्ट्र शासनाने सूची निश्चित करावी, क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करावी, तांडा-वस्त्यांवर मुलभूत सुविधा पुरवाव्यात, बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, स्पर्धा परीक्षा केंद्र आदींची व्यवस्था करण्याची मागणीसह एकूण २२ मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात प्रा. संदेश चव्हाण, विठ्ठल पवार, अ‍ॅड. पंजाब चव्हाण, संदीप राठोड, बाळू राठोड, शेषराव चव्हाण, राजकुमार राठोड, एस. पी. राठोड, बन्सीलाल राठोड, एल. डी. राठोड, विजय राठोड, बन्सीशेठ, डॉ.मांगीलाल राठोड, विठ्ठलराव राठोड, शंकर आडे, अ‍ॅड. संतोष राठोड, बन्सीमामा जाधव, रवी जाधव, बाळासाहेब पवार, रमेश राठोड, किसन आडे, भिकू महाराज, श्याम पाटील, गुलाब जाधव आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Banjara community also organized the reservation movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.